शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

झाडाखाली निवांत क्षण, आराम अन्…; स्वतःच्या फार्महाऊसवर पोहोचली प्राजक्ता माळी, चाहत्यांना दिसलं फरसाण, म्हणाले, “फरसाणची गोष्ट…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 3, 2023 | 12:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
prajakta mali karjat farmhouse

झाडाखाली निवांत क्षण, आराम अन्...; स्वतःच्या फार्महाऊसवर पोहोचली प्राजक्ता माळी, चाहत्यांना दिसलं फरसणार, म्हणाले, “फरसाणची गोष्ट...”

मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये आता प्राजक्ता माळीचं नावंही आवर्जुन घेतलं जातं. प्राजक्ताने अभिनयक्षेत्रामध्ये तिचा ठसा उमठवला. मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही ती काम करताना दिसली. आताही तिचे काही मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुराही ती उत्तमरित्या सांभाळते. त्याचबरोबरीने प्राजक्ता एक उत्तम व्यावसायिका आहे हे आता जवळपास साऱ्यांनाच ठाऊक आहे. काही दिवसांपूर्वी तर तिने फार्महाऊस घेतल्याची आनंदाची बातमी दिली.

प्राजक्ताने कर्जतमध्ये स्वतःचं हक्काचं फार्महाऊस उभारलं. तिने तिच्या फार्महाऊसचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. प्राजक्ताने फार्महाऊस घेतल्यानंतर अनेकांनी तिचं तोंडभरुन कौतुक केलं. तसेच एक स्वप्न सत्यात उतरलं असल्याचं तिने फार्महाऊस खरेदी केल्यानंतर सांगितलं. आता ती वेळात वेळ काढून तिच्या फार्महाऊसवर जात असते. आताही तिने शेअर केलेली पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – “मराठीत बोलायला लाज वाटते?” भाषेवरून ट्रोल करणाऱ्यांना सई ताम्हणकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आम्ही कोणत्या…”

प्राजक्ता सध्या तिच्या फार्महाऊसवर आहे. यादरम्यानचे फोटो तिने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केले आहेत. फोटोंमध्ये प्राजक्ता झाडाखाली निवांत झोपलेली दिसत आहे. तसेच झोपाळ्यावर बसून निवांत चहा पित आहे. “याचसाठी केला होता अट्टाहास. प्रत्येक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणि चित्रीकरण संपल्यानंतर ‘कुंज’वर आराम करणं गरजेचं आहे. कारण निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला शांती व समाधान मिळतं”.

आणखी वाचा – लग्नाआधीच गरोदर होत्या श्रीदेवी?, बोनी कपूर यांनी कित्येक वर्षांनी सांगितलं सत्य, म्हणाले, “आमचं शिर्डीमध्ये लग्न झालं आणि…”

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताचे हे फोटो पाहून चाहत्यांना तिचं फरसाण प्रेम आठवलं आहे. यामागचं कारण म्हणजे तिच्या फोटोंमध्ये फरसाण, भाकरवडी दिसत आहे. जिथे जा तिथे फरसाण, प्राजक्ता फरसाण नवीन प्रॉडक्ट कधी येणार?, म्हणजे फरसाणची गोष्ट खरी आहे, आम्हाला पण फरसाण खायची इच्छा झाली अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Tags: marathi actressmarathi movieprajakta mali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Nivedita Saraf honored State Government Award

Video : महाराष्ट्र शासनाकडून रौप्य पदक देत निवेदिता सराफ यांचा सन्मान, म्हणाल्या, "हा सन्मान माझा नसून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.