शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शाळेत उंचीमुळे…”, ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “हे सुवर्णपदक घेऊन…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 2, 2023 | 3:11 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
Mahesh jadhav won gold medal

Mahesh jadhav won gold medal

छोट्या पडद्यावरील ‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेत अप्रतिम भूमिका साकारत अभिनेता महेश जाधव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेलं ‘टॅलेंट’ ही व्यक्तिरेखा बरीच लोकप्रिय झाली. पुढे त्याने ‘कारभारी लय भारी’ काम केलं. एवढच करुन तो थांबला नाही तर ‘फकाट’, ‘माऊली’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. या क्षेत्रासह नुकतच त्याने आणखी एका क्षेत्रात यश मिळवलं आहे. (Mahesh jadhav won gold medal)

अभिनयाव्यतिरिक्त महेश गेली अनेक वर्षे पॉवरलिफ्टिंगच्या तयारी करत होता. त्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली. त्यामुळे नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग चॉम्पियनशिप’मध्ये पुरुषी ४९ किलो वजनी गटात त्याने सुवर्णपदक पटकावलं आहे. सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर त्याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Jadhav (@mahesh_jadhav15)

आणखी वाचा – “भारत को छेडोगे तो…”, कंगना रणौतच्या ‘तेजस’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

तो लिहीतो, “शाळेत प्रार्थनेच्या रांगेत नं. 1 ला उभा ‘Height’ मुळे, आज तुमच्यासमोर हे Gold घेऊन उभा ‘Fight ‘ मुळे”. आज तुम्हाला सांगायला आनंद होताये की 2nd Maharashtra State Para Powerlifting Championship 2023- 24 कल्याण येथे झाली. त्यामध्ये Men’s 49Kg मध्ये मी Gold मेडल मिळवले आहे. यामागे खूप मेहनत तर आहेच पण  त्याचबरोबर खूप लोकांचा सल्ला, मार्गदर्शनही आहे. यात मला माझे कलीम सर ,माझा मित्र  विनोद तावरे याचे  खूप सहकार्य मिळाले. तसेच एखाद्या खेळाडूला Practice, Workout बरोबर Diet पण खूप important असतो. तसं माझं काय खाऊ काय नको हे बघणारी डॉक्टर आणि मला कायम सपोर्ट करत आलेला माझा खूप मोठ्ठा असा मित्रपरिवार, या सगळ्यांचा मी आभारी आहे”, असं म्हणत त्याने या यशामागे ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे आभार मानले.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Jadhav (@mahesh_jadhav15)

आणखी वाचा – कोकणची शान नेहा पाटील ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती; मिळवला ‘महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी’चा बहुमान

तसेच पुढे तो लिहीतो, “तुम्ही प्रेक्षक कायम माझ्यावर प्रेम करत आला आहात तर ही दुसरी Innning तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो”, असं म्हणत प्रेक्षकवर्गाच्या प्रेम व सहकार्याचेही आभार मानले. त्याच्या या पोस्टवर कलाकारांसह नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेता निखिल चव्हाण लिहितो, ‘जिद्दीच उत्तम उदाहरण आहेस तू… अभिनंदन खूप खूप प्रेम’, असं लिहित त्याचं कौतुक केलं आहे. तर बऱ्याच नेटकऱ्यांनी, ‘congratulations’ म्हणत त्याच्या कामगिरीसाठी अभिनंदन केलं आहे.  

Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Deepa chaudhari gave special gift to kabir

Video: धनश्रीच्या लेकासाठी दीपाचं खास गिफ्ट; व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने मानले आभार, म्हणाली “ही एक सुंदर…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.