बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान त्याच्या कामाबरोबर तो खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. शाहरुखने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्याचा इथपर्यंतचा प्रवास जितका रंजक आहे, तितकीच त्याची आणि गौरी खानची गोड लव्हस्टोरी आहे. शाहरुख आणि गौरीच्या लग्नाला २२ वर्ष झाली असून शाहरुखने यावेळी त्याच्या लग्नात घडलेला एक किस्सा सांगितला. (Shahrukh Khan share his moment)
हा काळ होता, जेव्हा १८ वर्षाचा शाहरुख सिनेसृष्टीत येण्यासाठी संघर्ष करत होता. त्यावेळी एका पार्टीत त्याने गौरी छिब्बरला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. तेव्हाच त्याने ठरवलं होतं की, मी लग्न करेन तर फक्त गौरीशीच. पण धर्मामुळे गौरीच्या आई-वडिलांनी या नात्याला नकार दिला होता. मात्र, करोडो चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्याला गौरीच्या पालकांची मनं जिंकणं तितकं अवघड नव्हतं. त्याने कसंतरी हिंदू मुलगा बनून तिच्या आई-वडिलांना समजावलं आणि २५ ऑक्टोबर १९९१ मध्ये दोघांनी हिंदू रीती-रिवाजानुसार लग्न केले.
हे देखील वाचा – “जास्त दारू प्यायली का?”, सुकन्या मोनेंच्या ‘त्या’ व्हिडिओवर महिलेची कमेंट, अभिनेत्री म्हणाली, “ही नशा…”
असाच त्याचा लग्नाचा एक किस्सा शाहरुखने सांगितला. ज्यात त्याने सासरच्या मंडळींशी एक फ्रॅंक केला होता. ते पाहून त्याच्या नातेवाईकांसह सर्वच जण चकित झाले होते. ९०च्या काळात दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख म्हणाला की, “मी दुसऱ्या धर्माचा असल्याने लग्नाला आलेले काही नातेवाईक लग्नाबद्दल उलटसुलट चर्चा करत होते. लग्नानंतर तो गौरीचं नाव बदलायला किंवा तिला धर्मांतर करायला सांगेल, असं लोक बोलत होते.”
हे देखील वाचा – Video : लेक सोहमसह आदेश बांदेकरांचा लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत भन्नाट डान्स, लालबागच्या रस्त्यांवरील व्हिडिओ व्हायरल
“हे सगळं पाहून मी तेव्हा सर्वांसमोर एक फ्रॅंक केला आणि गौरीला बुरखा परिधान करायला आणि नमाज पठण करायला सांगितलं. हे पाहून लोक चकित झाले आणि म्हणाले, हा तर आताच बदलला. तेव्हा मी म्हणालो, “आता गौरीचं नाव बदलून आयशा करेल. ती नमाज पठण करेल, तिला घराबाहेर जाऊ देणारही नाही वगैरे.” यावेळी उपस्थित नातेवाईक काही वेळासाठी स्तब्ध झाले आणि पूर्ण वातावरण बदलले.”, असं शाहरुख म्हणाला. शाहरुखच्या सासरची मंडळी खूपच चांगली असून गौरीचे आई-वडील मुलीपेक्षा जास्त प्रेम जावयावर करतात, असं तो म्हणाला.