गेली तीन दशकं रवीना टंडन प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. कित्येक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत तिने चाहत्यांना आपलसं केलं. पण चित्रपटांमध्ये काम करत असताना तिने काही मर्यादा ओलांडायच्या नाहीत असं ठरवलं. ऑनस्क्रीन नो किसिंग नियम तिने फॉलो केला. चित्रपटात किसिंग सीन द्यायचा नाही हे रवीनाने सुरुवातीपासूनच ठरवलं होतं. मात्र तिच्या एका सहकलाकाराने चुकून रवीनाला लिप किस केलं होतं. त्यादरम्यान घडलेली घटना तिने स्वतः सांगितली आहे.
रवीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किसिंग सीनबाबत भाष्य केलं. किसिंग सीन करताना तिला स्वतःला योग्य वाटत नसल्याचं रवीनाचं म्हणणं आहे. रवीनाने नकारात्मक भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्याने तिला चुकून लिप किस केल्याचं स्पष्ट केलं. पण त्या अभिनेत्याचं नाव सांगण्यास तिने स्पष्ट नकार दिला. मात्र अभिनेत्याने किस केल्यानंतर रवीनाची विचित्र अवस्था झाली होती.
रवीनाने अभिनेत्याने लिप किस केल्यानंतर लगेचच ती तिच्या रुममध्ये गेली आणि तिने उलटी केली. “जा तुम्ही आधी ब्रश करा आणि शंभर वेळा तरी स्वतःचं तोंड धुवा” असं रवीना त्या अभिनेत्याबाबत स्वतःशीट पुटपुटली होती. चित्रपटांमध्ये किसिंग सीन न देणं हा तिचा स्वतःचा निर्णय होता. अगदी शेवटपर्यंत रवीना तिच्या या निर्णयावर ठाम राहिली आहे.
“तुमच्या मुलीला भविष्यामध्ये चित्रपटांमध्ये जर किसिंग सीन द्यायचा असेल तर तुमची सहमती असेल का?” असा प्रश्नही रवीनाला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “माझी मुलगी राशाला जर चित्रपटांमध्ये किसिंग सीन द्यायचा असेल तर ती करु शकते. तो सीन करत असताना तिला कितपत योग्य वाटत आहे हे महत्त्वाचं आहे. जर ती अशाप्रकारचे सीन आत्मविश्वासाने करत असेल तर तिला हात लावण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही”. सध्यातरी रवीनाची लेक बॉलिवूडपासून दूर आहे.