रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हातात काठी, डोक्यावर टोपी अन्…; केदारनाथला पोहोचली ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरु, मंदिराबाहेरील फोटो शेअर करत म्हणाली…

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 29, 2023 | 5:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rinku Rajguru takes darshan of Kedarnath

रिंकू राजगुरूने घेतले केदारनाथचे दर्शन

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला होता. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अनेक नवे कलाकार आले होते. अभिनेत्री रिंकू राजगुरूने याच चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने साकारलेली ‘आर्ची’ भूमिका प्रचंड गाजली असून या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. पण त्यानंतर आलेल्या चित्रपटांना फारसं यश मिळालं नसलं. तरी तिच्या लोकप्रियतेत कमी झाली नाही. अशातच रिंकूने जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले असून तेथील काही फोटोज समोर आले. (Rinku Rajguru took darshan of Kedarnath temple)

रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती याद्वारे तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित अनेक फोटोज व व्हिडिओज चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण काही दिवसांपूर्वी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील अनेक पोस्ट्स हटवले होते, त्याची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र त्यानंतर काही दिवसातच एक फोटोशूट केला होता. आता रिंकू नुकतीच केदारनाथच्या दौऱ्यावर गेली होती. त्याचे फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

हे देखील पाहा – अभिनेत्याने रवीना टंडनला सेटवरच केलं होतं लिप किस, अभिनेत्रीने केली होती उलटी, म्हणाली, “आधी ब्रश करा आणि…”

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराबाहेरचा फोटो तिने शेअर केला आहे. सुंदरसा ड्रेस, त्यावर भगवी शाल आणि कपाळावर चंदन यांमध्ये ती अतिशय सुंदर दिसते. हा फोटो शेअर करताना तिने “हर हर महादेव” असं कॅप्शन दिलं आहे. तर दुसऱ्या फोटोत ती हातात काठी घेत मंदिराकडे जाताना दिसत आहे. तिचे हे फोटोज व्हायरल झाले असून या पोस्टवर चाहते कमेंटद्वारे तिचं कौतुक करत आहे. रिंकूने ‘सैराट’सह ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झुंड’ अश्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. सध्या ती एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून लवकरच ती ‘खिल्लार’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: marathi actressrinku rajguruRinku Rajguru takes darshan of Kedarnath
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Aadesh & Soham Bandekar in Lalbaghcha Raja visarjan miravnuk

Video : लेक सोहमसह आदेश बांदेकरांचा लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत भन्नाट डान्स, लालबागच्या रस्त्यांवरील व्हिडिओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.