सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खास दागिने, मराठमोळा साज अन्…; अक्षरा व अधिपतीचा लग्नसोहळा ठरणार खास, फोटोंनी वेधलं लक्ष

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 28, 2023 | 7:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Akshara and adhipati wedding look

Akshara and adhipati wedding look

छोट्या पडद्यावरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. ऋषिकेश शेलार, कविता लाड, शिवानी रांगोळे यांच्यासह मालिकेतील इतर कलाकारांच्या भूमिकांचंही विशेष कौतुक होत आहे. विशेष म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ टीआरपीच्या शर्यतीमध्ये टॉपला आहे. आता येत्या १ तारखेलाला या मालिकेचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. यामध्ये मालिकेती मुख्य पात्र अक्षरा (शिवानी रांगोळे) व अधिपतीचा (ऋषिकेश शेलार) शाही विवाहसोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. या विवाहसोहळ्याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.(Akshara and adhipati wedding look)

गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरा व अधिपतीची लगीनघाई मालिकेमध्ये सुरु आहे. अधिपतीची आई म्हणजे भूवनेश्वरीला (कविता लाड) लेकाचं लग्न भव्यदिव्य करायची इच्छा आहे. त्याच दिशेने आता मालिकेने एक अनोखं वळण घेतलं आहे. या मालिकेच्यानिमित्ताने टेलिव्हीजन विश्वात आणखी एक शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेची सुपरहिट हिंदी वेबसिरिजमध्ये एण्ट्री, अभिनेत्रीच्या हटके लूकने वेधलं लक्ष

अक्षरा व अधिपतीच्या लग्नाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणेच हा विवाहसोहळा होणार असल्याचं आता समोर आलं आहे. लग्नसोहळ्यात मुख्य पात्रांच्या लूककडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. साडी, दागिने, मराठमोळा साज सारं काही अगदी खास आहे. अक्षरा व अधिपतीचे पारंपरिक लूकमधील काही फोटो समोर आले आहेत.

आणखी वाचा – परिणीती चोप्राचं मंगळसूत्र तुम्ही पाहिलंत का?, बहिण प्रियांका चोप्राशी काय आहे कनेक्शन?, खास डिझाइनने वेधलं लक्ष

या फोटोंमध्ये अक्षरा हिरव्या रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे. तिने साडीला साजेसे दागिने घातले आहेत. यावर तिने कोल्हापूरी साज, बाजूबंध, हातात तोडे, नाकात नथ, कानात झुमके घातले आहेत. शिवाय तिच्या कपाळावरील चंद्रकोर विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. तर दुसरीकडे अधिपतीनेही जांभळ्या रंगाचा सदरा पायजमा, डोक्यावर हिरव्या रंगाचा फेटा बांधत पारंपरिक पेहराव केला केला. ही मालिका कथानकाबाबत प्रेक्षकांची आणखीनच उत्सुकता वाढवणार एवढं नक्की.

Tags: adhipatiaksharaakshara adhipati weddingakshara bride wedding look photomarathi serialtula shikvin changlach dhada
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shiny Doshi Shocking Revelation
Entertainment

“तू धंदा करायला जातेस का?”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीला वडीलांकडूनच घाणेरडी वागणूक, आईलाही लाथा-बुक्क्यांनी मारायचे तेव्हा…

मे 12, 2025 | 7:00 pm
handicap couple love story
Social

Video : अपघातात गमावले दोन्ही हात, तरीही गर्लफ्रेंडने केलं लग्न; सात वर्षांच्या प्रेमाला घरातून विरोध असताना…

मे 12, 2025 | 6:33 pm
Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Next Post
Radha Sagar reveals her Baby face

बाळाच्या जन्मानंतर 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीने दाखवली बाळाची पहिली झलक, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "माझा बाप्पा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.