बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू धंदा करायला जातेस का?”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीला वडिलांकडूनच घाणेरडी वागणूक, आईलाही लाथा-बुक्क्यांनी मारायचे तेव्हा…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 13, 2025 | 10:54 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shiny Doshi Shocking Revelation

"तू धंदा करायला जातेस का?", सुप्रसिद्ध अभिनेत्रीला वडीलांकडूनच घाणेरडी वागणूक, आईलाही लाथा-बुक्क्यांनी मारायचे तेव्हा…

Shiny Doshi Shocking Revelation : अभिनेत्री शाईनी दोशीने आजवर बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. २०१२ मध्ये ती मुंबईला आली आणि संजय लीला भन्साळी यांचा ‘सरस्वती चंद्र’ हा पहिला शो तिला मिळाला. यावेळी तिला अभिनय काय आहे हे देखील माहित नव्हते कारण तिने यांत काहीच शिक्षण घेतले नव्हते. तिने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती काही कारणास्तव अभिनयात आली आहे. आणि हे कारण असे होते की तिच्या वडिलांनी तिला सोडले होते. आणि त्याचवेळी अभिनेत्रीला तिच्या कॉलेजची फी स्वत: द्यावी लागायची. यादरम्यान कोणीही काळजी घेणार नव्हता. तिने असेही सांगितले की, तिचे वडील तिला ‘वेश्या’ म्हणत असत. अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरानेही तिची बर्‍याच वेळा फसवणूक केली आहे.

शाईनी दोशी हिने मुलाखतीत सांगितले की, “माझी काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. मला माझ्या कुटुंबाची एका मुलाप्रमाणे जबाबदारी घ्यावी लागली. मला एक मुलगा म्हणून प्रत्येकाची काळजी घ्यावी लागली. जेव्हा मी मुंबईला आले तेव्हा माझ्या खात्यात सुमारे १५ हजार रुपये होते. मी कुठे राहणार आहे हेदेखील मला माहित नव्हते. मी काम करण्यास कसे सक्षम होईन या सर्व कारणास्तव मी अहमदाबादमध्ये मॉडेलिंग केले. छोट्या छोट्या जाहिरातींमध्ये काम केले. माझ्या आईची इच्छा होती की, मी अभिनेत्री व्हावी आणि मला डॉक्टर व्हायचे होते. आमच्या घरात आईच वर्चस्व अधिक होतं, तिने दोन्ही पालकांची भूमिका साकारली”.

आणखी वाचा – Video : बायकोला मंगळसूत्र घालताना भर मंडपात रडला अक्षय केळकर, अश्रूच थांबेनात अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

शाईनीने सांगितले की, तिने बर्‍याच ऑडिशन दिल्या आहेत आणि मग तिला तिचा पहिला शो मिळाला. तिने सांगितले की, जेव्हा तिचे पालक विभक्त झाले, तेव्हा वडिलांकडील कुटुंबीयांनी तिच्याशी असलेला संबंध तोडला. आणि जेव्हा तिचा पहिला शो आला तेव्हा वडिलांकडील कुटुंबाला आश्चर्य वाटले की, तिच्या आईने तिला चांगलं घडवलं. अभिनेत्री म्हणाली, “मी एका पुराणमतवादी गुजराती कुटुंबातून आले आहे. आमच्या कुटुंबात अभिनयाकडे खालच्या नजरेने पाहिले जाते. ही एक अभिनेत्री आहे म्हणजे ही काय काम करत असेल, अशा नजरेने पाहिलं जातं. अभिनेते असे आहेत. माझ्या कुटुंबात असे बरेच लोक होते जे मला एक अभिनेत्री आहेस म्हणजे वेश्या आहेस असं म्हणायचे. पण जेव्हा पहिला शो आला तेव्हा सगळ्यांची तोंड बंद झाली”.

आणखी वाचा – वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

शाईनीने नोंदवले की, तिचे पालक वयाच्या १६ व्या वर्षी विभक्त झाले आहेत. आणि त्यानंतर सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. अभिनेत्रीने सांगितले की, कालांतराने तिच्या वडिलांनी पैसे देणे बंद केले आहे, तेव्हा आईने ते आम्हाला सोडून गेले आहेत याची जाणीव करुन दिली नाही. ती तिचे सोन्याचे दागिने विकत होती आणि तिचा खर्च खर्च करीत होती. एके दिवशी रेशन दुकानदारांनी आईला रेशन देण्यास नकार दिला कारण तीन महिन्यांपासून बिल दिले नव्हते. त्याचवेळेला कॉलेजची फीदेखील भरता आली नाही म्हणून प्राध्यापकांनी फी भरेपर्यंत कॉलेजला येण्यास बंदी घातली”.

आणखी वाचा – “तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

शाईनी पुढे म्हणाली की, “वडील आईला खूप मारत असत. माझ्या आईने लाथा-बुक्क्यांचा मार खाल्ला आहे आणि मी हे सर्व पहायचे तेव्हा मला भीती वाटायची. हे सर्व पाहून मी स्वत: ला खोलीत लॉक करायचे कारण ते मला पटायचे नाही. माझे वडील माझे ऐकत असत. मी आजही त्यांच्यावर प्रेम करते. ते सध्या या जगात नाहीत. बालपण पूर्णपणे आपत्ती होती. पण मी लहानपणाच्या आघातातून एक गोष्ट शिकले की मी माझे आयुष्य घडवणार आणि ते मी वाया जाऊ देणार नाही”. शाईनीने सांगितले की, तिचे वडील तिला’वेश्या’ म्हणत असत. जेव्हा त्यांचे आईशी भांडण झाले तेव्हा तेव्हा ते आईला घाणेरड्या शब्दांत बोलायचे. ते माझ्या आईला विचारायचे की, रात्री तीन वाजता तू माझ्या लेकीला घेऊन येतेस?, एवढ्या रात्री पर्यंत काय काम असतं?, धंदा करायला घेऊन जातेस का?. त्यांची भाषा खूप भयंकर असायची.

Tags: entertainment newsshocking revelationtelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Kartiki Gaikwad Baby Birthday

कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस, सुंदर फोटोशूट करत दाखवला चेहरा, नाव आहे…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.