अभिनेत्री परिणीती चोप्रा व आपचे नेते राघव चड्ढा २४ सप्टेंबरला विवाहबंधानात अडकले. राजस्थानमधील उदयपूर येथील द लीला पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली. त्याचबरोबर अनेक राजकीय नेते मंडळी ही लग्नात उपस्थित होती. सध्या सोशल मीडियावर परिणीती व राघवच्य लग्नाचे फोटो बरेच चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नातील थाट, नवीन जोडप्याचा डान्स यांसारखे बरेच व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान आणखी एक गोष्ट सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे परिणीतीचं मंगळसूत्र. या मंगळसूत्राचं अभिनेत्री प्रियांका चोप्राशी कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे.(Parineeti mangalsutra design similar with Priyanka’s mangalsutra)
शाही विवाहसोहळ्यानंतर नवविवाहित जोडपं दिल्लीला पोहोचलं. दिल्ली विमानतळावरील या दोघांचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. यावेळी नववधू साध्या सुंदर रुपात दिसली. परिणीतीने निऑन कलरचा ड्रेस घातला होता. याचबरोबर तिने हातात चुडा, कपाळावर कुंकू आणि विशेष म्हणजे गळ्यातील मंगळसूत्र अशा पारंपारिक लूकमध्ये पाहायला मिळाली. यावेळी परिणीतीच्या गळ्यातील मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

परिणीतीच्या मंगळसूत्राच्या वेगळ्या डिझाईनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मंगळसूत्रात इन्फिनीटीचं चिन्ह पाहायला मिळालं. या चिन्हाच्या पुढे मध्यभागी एक मोठा हिरा तर त्याच्यावर आणखी दोन छोटे हिरे आहे. काळेमणी व बारीक सोन्याच्या साखळीने मंगळसूत्राची संपूर्ण डिझाईन पाहायला मिळाली.
परिणीतीच्या मंगळसूत्राची डिझाईन बहिण अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या मंगळसूत्राच्या डिझाईनशी अगदी मिळती जुळती आहे. प्रियांकाने २०१८ मध्ये हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक निक जोनससह लग्नगाठ बांधली. निकने प्रियांकासाठी वेगळ्या डिझाईनचं मंगळसूत्र घातलं होतं. तिच्या मंगळसूत्रातही एक मोठा हिरा आहे. त्या हिऱ्याच्या वर तीन छोटे हिरे दिसतात. प्रियांकाच्या मंगळसूत्रात सोन्याची पातळ साखळी व काळे मणीदेखील पाहायला मिळतात. त्यामुळे परिणीती व प्रियांका या दोघांचीही मंगळसूत्र मिळती जुळती आहेत.