जगभरात अजूनही शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाची जादू पहायला मिळत आहे. अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री नयनतारा यांचा हा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढले. रिलीज होऊन आता बरेच दिवस उलटले असले तरीही चित्रपटगृहांमध्ये याचा दबदबा पाहायला मिळत आहे. चित्रपट शाहरुखसह अभिनेत्री नयनतारा, अभिनेता विजय सेतुपति, तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोण यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सजलेला आहे. (jawan worldwide Box office collection)
प्रदर्शित होण्याअगोदरपासूनच हा चित्रपट बराच चर्चेत होता. पण इतक्या जलद गतीने हा चित्रपट सगळे रेकॉर्ड तोडेल याची अपेक्षा कोणालाही नव्हती. या चित्रपटात शाहरुखने साकारलेली नायकाची भूमिका व विजय सेतुपति याचा खलनायकातील ‘काली’ अवतार यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा मिळवली. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरला आहे.
‘जवान’ने आतापर्यंत ताबडतोड कमाई केली आहे. निर्मात्यांनी २४ सप्टेंबरला चित्रपटाचे जागतिक कलेक्शन शेअर केले. आतापर्यंत चित्रपटाने ९७९.०८ करोडची कमाई केली आहे. असं बोललं जात आहे की, लवकरचं हा चित्रपट शाहरुखच्या ‘पठान’ चित्रपटालाही मागे टाकत नव्या रेकॉर्डची नोंद करणार आहे. २५ जानेवारी २०२३ला रीलिज झालेला शाहरुख व दीपिका यांचा ‘पठान’ चित्रपट बराच गाजला होता. त्याने वर्ल्डवाईड १०५०.८ करोड रुपयांचं कलेक्शन केलं होतं. त्यामुळे हा चित्रपट १००० करोड रुपयांचा आकडा कधी पार करणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.
‘जवान’ चित्रपटाची कथा प्रेक्षकांना बरीच आकर्षित करत आहे. हा चित्रपट भारतात होणाऱ्या भ्रष्टाचारावर आधारित आहे. चित्रपटात शाहरुखचे विविध अवतार पहायला मिळत आहेत. विक्रम राठोड व आजाद अशी दुहेरी भुमिकेत भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देताना दिसत आहे. यात शाहरुख समवेत नयनतारा, दीपिका व विजय यांच्यासह अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री प्रियामणी व अभिनेत्री सान्या मल्होत्रा याही प्रमुख भूमिकेत आहेत.