Raghav Parineeti Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा व राघव चड्ढा अखेर काल विवाहबंधनात अडकले. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’ येथे मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा पार पडला. परिणिती व राघवचा या शाही विवाहसोहळ्यात फोटोज नुकतेच समोर आले. ज्यामध्ये हे दोघे अतिशय सुंदर दिसत आहे. (Parineeti Raghav Wedding Photo)
परिणिती व राघव यांचा मे महिन्यात साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर दोन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमानंतर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. मोठ्या धुमधडाक्यात परिणिती-राघवचा शाही विवाहसोहळा पार पडला असून या सोहळ्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आदित्य ठाकरे, हरभजन सिंह, सानिया मिर्जा, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा व अन्य बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. मात्र, परिणितीची बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही या सोहळ्याला अनुपस्थित राहिली.
परिणितीने नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोजमध्ये ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. लग्नावेळी परिणीतीने क्रीम रंगाचा लेहंगा परिधान केला होता. हातात गुलाबी चुडा, सुंदर आभूषणे यांमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तर पांढऱ्या रंगाची शेरवानी व सोनेरी फेट्यामध्ये राघव अगदी शोभून दिसत आहे. हा फोटो शेअर करताना परिणिती म्हणाली की, “नाश्त्याच्या टेबलवर झालेल्या पहिल्याच मुलाखतीपासून आमची मने जुळली होती. या दिवसाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होतो. अखेर आम्हाला मिस्टर आणि मिसेस बनण्याचं भाग्य मिळालं. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. आता या प्रवासाला कायमस्वरूपी सुरुवात झाली आहे.”
अभिनेत्रीने हा फोटो शेअर करताच बहीण प्रियांका चोप्राने कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय अन्य कलाकार व चाहत्यांनीदेखील या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, लग्नानंतर विवाहस्थळी पार पडलेल्या स्वागत समारंभाचेही फोटोज समोर आले आहे. त्यामध्येही ही जोडी अगदी खुलून दिसत आहे.
हे देखील वाचा – ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री करायची मॅकडोनॉल्डमध्ये काम; फोटो शेअर करत म्हणाली, “पहिला जॉब…”
२०२३ च्या सुरुवातीला जेव्हा परिणीती व राघव मुंबईत एकत्र स्पॉट झाले. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. तेव्हा त्यांनी यावर मौन बाळगणं पसंत केलं होतं. मात्र, मी महिन्यात दोघांनी साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर शाही थाटात काल ही जोडी विवाहबंधनात अडकली.