बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पुनम पांडे जितकी तिच्या फोटोज व व्हिडिओजमुळे चर्चेत राहतेच, तितकीच ती तिच्या वादांमुळे सर्वाधिक चर्चेत राहते. पुनम पांडे ही रुपेरी पडद्यावर फारशी दिसत नसली, तरी ती अनेक म्युझिक अल्बममध्ये दिसली आहे. शिवाय, ती ‘लॉकअप’ शोमध्ये शेवटची दिसली होती. मात्र, याच अभिनेत्रीबाबत एक मोठी घटना घडली आहे. पुनम पांडेच्या मुंबईतील घराला आग लागली आहे. या आगीत तिच्या घराचे मोठे नुकसान झाले असून तिची बेडरूम पूर्णपणे जळाली आहे. (Poonam Pandey House Fire)
या आगीचे कारण अद्याप समोर आले नसून घटनेवेळी अभिनेत्री घरात नव्हती. या आगीत पुनमच्या पाळीव कुत्रा अडकला होता, मात्र त्याला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, या आगीचे काही फोटोज समोर आले आहेत. ज्यात तिच्या घराची झालेली अवस्था पाहायला मिळत आहे. आगीची घटना कळताच पुनमने तात्काळ घराकडे धाव घेतली आणि या घटनेची माहिती घेतली. सध्या अभिनेत्री, तिची बहीण आणि कुत्रा सुखरूप असल्याचे समोर आले आहे.
हे देखील वाचा – Video : एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचं प्रसिद्ध अभिनेत्याला किस, व्हिडीओ व्हायरल
माध्यमांच्या माहितीनुसार, ज्यावेळेस ही घटना घडली. त्यावेळेस त्या अपार्टमेंटमधील एका तरुणाने अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. तेव्हा तातडीने अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळावर पोहोचली व त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण अदयाप समजू शकले नाही. मात्र, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागले असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा – हनिमूनला असतानाच विशाखा सुभेदारच्या महाविद्यालयीन परीक्षेचा लागला होता निकाल, खुलासा करत म्हणाली, “खूप लवकर लग्न झालं आणि…”
सध्या पुनम तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून काही दिवसांपुर्वी ती एका पार्टीत दिसली होती. त्याचे फोटोज तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.