मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचं प्रसिद्ध अभिनेत्याला किस, व्हिडीओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 16, 2023 | 6:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sophie Turner viral video after separation

Video : एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचं प्रसिद्ध अभिनेत्याला किस, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नरने काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची घोषणा केली आहे. सोफीने २०१९ मध्ये निक जोनसचा मोठा भाऊ जो जोनसबरोबर विवाह केला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या चार वर्षातच हे दोघे वेगळे झाले आहे. मागील आठवड्यात या दोघांनी घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली होती. अशातच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका अभिनेत्याला किस करताना दिसत आहे. (Sophie Turner viral video after separation)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सोफी टर्नर स्पेनमध्ये ‘जोन’ नावाच्या सीरिजचे शूटिंग करत आहे. ज्यात ती एक सीन करताना तिचा सहकलाकार फ्रँक डिलनला किस करत आहे. पुढे सोफी आणि फ्रँक समुद्रात मस्ती करताना दिसत असून दोघेही एकमेकांवर पाणी उडवताना, हसताना दिसत आहेत. त्याचदरम्यान, ते एकमेकांना किस करताना दिसत आहेत. या दोघांचा हा व्हिडिओ अभिनेत्याच्या अनधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच याची जोरदार चर्चा रंगत आहे.

Frank Dillane and Sophie Turner spotted filming at Joan’s set in Spain!

via splash! pic.twitter.com/EOeAmNlfay

— Frank Dillane News (@dillanedaily) September 15, 2023

हे देखील वाचा – “मसाज करणाऱ्या बाईने मला…”, वाढत्या वजनावरुन हिणावल्यानंतर रडू लागली विद्या बालन, म्हणाली, “माझ्या शरीराबाबत…”

सोफी टर्नर व फ्रँक डिलन ‘जोन’ या आगामी सीरिजमध्ये झळकणार आहे. ज्यामध्ये सोफी ब्रिटिश ज्वेल चोर जॉन हॅनिंग्टनची भूमिका साकारणार आहे. तर फ्रँक तिच्या पतीची भूमिका करतोय. इंग्लंडमध्ये मे महिन्यात या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. अभिनेत्याबद्दल बोलायचे झाल्यास, ‘फिअर द वॉकिंग डेड’ आणि ‘हॅरी पॉटर अँड द हाफ-ब्लड प्रिन्स’ मधील भूमिकांसाठी फ्रँक डिलन ओळखला जातो.

हे देखील वाचा – Video : ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने घाटात चालवली गाडी, म्हणाली, “गाडी चालवता येणं…”

दरम्यान, निक जोनसचा भाऊ जो आणि सोफी टर्नर २०१६ मध्ये एकमेकांना भेटले होते. त्यांनी काही वर्ष डेट केल्यानंतर २०१९ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. या जोडीला दोन मुली असून लग्नाच्या चार वर्षांनी ते दोघे वेगळे होत आहेत.

Tags: bollywoodgame of thronesottpriyanka chopraSophie Turner
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Poonam Pandey House Fire

पुनम पांडेच्या मुंबईतील राहत्या घरी भीषण आग, भयावह फोटो समोर, घरातील कुत्र्याचे प्राण वाचले कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.