शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ दिवशी परिणीती चोप्रा व राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिकाही आली समोर

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 14, 2023 | 4:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding

'या' दिवशी परिणीती चोप्रा व राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिकाही आली समोर

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व तिचा होणारा पती राघव चड्ढा हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील उदयपूर येथे २३ व २४ सप्टेंबर रोजी या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. या दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. १३ मे रोजी साखरपुडा पार पडल्यानंतर हे दोघे कधी लग्न करणार? याबाबत चांगलाच सप्सेन्स होता. पण आता या दोघांच्या लग्नाची पत्रिका समोर आलं असून साखरपुड्याच्या चार महिन्यांनंतर हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding)

समोर आलेल्या लग्नपत्रिकेनुसार, येत्या २४ सप्टेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील ‘द लीला पॅलेस’ हॉटेलमध्ये परिणीती आणि राघव पारंपरिक रितीरिवाजाने विवाहबंधनात अडकणार आहेत. हा शाही विवाह सोहळा दोन दिवस सुरु असणार आहेत. मात्र, त्याआधी २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता परिणीतीचा चुडा समारंभ होईल. त्यानंतर दुपारी शाही भोजनाचा कार्यक्रम होईल. शाही भोजनानंतर संध्याकाळी ७ वाजता संगीत समारंभ होणार आहे.

हे देखील वाचा – ‘द कपिल शर्मा’मध्ये प्रेक्षक म्हणून जाण्यासाठी द्यावे लागतात ५ हजार रुपये, कपिलने सांगितलं सत्य, म्हणाला, “आम्ही प्रेक्षकांकडून…”

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

तर, २४ सप्टेंबरला दुपारी १ वाजता राघव चड्ढा यांच्या सेहराबंदीने लग्नाच्या विधींना सुरुवात होईल. दुपारी २ वाजता लग्नाची वरात निघणार असून ३ वाजेपासून परिणीती व राघवच्या लग्नविधीला सुरुवात होईल. पुढे लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता परिणितीचा पाठवणीचा सोहळा होईल. आणि शेवटी रात्री ८.३० वाजेपासून ‘द लीला पॅलेस’मधील उपस्थितांसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले जाईल.

हे देखील वाचा – Video : पाहता पाहता रेखा यांनी चाहत्याच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं?, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

परिणीती व राघव यांनी जेव्हा त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती, तेव्हापासून ते गेली अनेक दिवस विविध ठिकाणी स्पॉट झालेली आहेत. दोघांच्या घरी लग्नाची लगबग सुरु असून नूकताच या दोघांनी विदेशात शाॅपिंगही केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या विवाहसोहळ्याला बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे.

Tags: bollywood newsParineeti Chopra Raghav Chadha Weddingparineeti chopra wedding
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Govinda Enquitry In Online Ponzi Scheme

१००० कोटींच्या ऑनलाइन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी अभिनेता गोविंदाची चौकशी होणार, अधिकाऱ्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.