शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जितेंद्र आव्हाड शाहरुख खानच्या पाठिशी, ‘जवान’बाबत केलं ट्वीट, म्हणाले, “मुंब्रा-कळव्यामधील तरुणांसाठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 13, 2023 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jitendra Awhad On Jawan Movie

जितेंद्र आव्हाड शाहरुख खानच्या पाठिशी, 'जवान'बाबत केलं ट्वीट, म्हणाले, "मुंब्रा-कळव्यामधील तरुणांसाठी..."

अनेक दिवसांपासून प्रेक्षक शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालतोय. ७ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या सिनेमाने बक्कळ कमाई केली. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला पाहण्यासाठी गर्दी केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींची छप्परफाड कमाई केली. जगभरात आता या चित्रपटाची चर्चा सुरु असून आतापर्यंत या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. (Jitendra Awhad On Jawan Movie)

‘जवान’ चित्रपटातील बरेच सीन्स, डायलॉग्स वायरल होत आहेत. ‘खर्‍याखुर्‍या’ विषयावर परखडपणे भाष्य करून ‘जवान’ चित्रपटाने वास्तवाचं भान साऱ्यांना करून दिलं. चित्रपटातील शाहरुख खानचा क्लायमॅक्सच्या मोनोलॉगही सध्या चर्चेत आहे. या मोनोलॉगमुळे व चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या वास्तविकतेमुळे याबद्दल होणाऱ्या चर्चेला एक राजकीय रंग चढला आहे.

आणखी वाचा – “वास्तविकता पडद्यावर मांडायला…”, शाहरुख खानचा ‘जवान’ पाहिल्यानंतर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “खूप दिवसांनी…”

The the first lot of youngsters of kalwa-mmbra will go and watch the movie #JAWAN tmrw at 7pm at Viviana Mall .Thana@iamsrk ⁦@iamsrk⁩ pic.twitter.com/jiM85eJcGP

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 12, 2023

काही राजकीय नेत्यांनी हा चित्रपट ‘गदर २’प्रमाणे संसदेत दाखवला पाहिजे, अशी मागणी केली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या चित्रपटाला पाठिंबा दर्शविलेला पाहायला मिळतोय. जितेंद्र आव्हाड यांचा कळवा, मुंब्रा व ठाणे या शहरात दबदबा असून त्यांनी कळवा मुंब्रामधील तरुणांना एक खास भेट दिली आहे.

आणखी वाचा – “पूर्ण चित्रपट मी बघू शकलो नाही कारण…”, शाहरुख खानच्या ‘जवान’वर नाना पाटेकरांची अप्रत्यक्ष टीका, म्हणाले, “पुन्हा तेच-तेच…”

याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरून ट्विट करून दिली. कळवा, मुंब्रा परिसरातील तरुण मुलांसाठी ‘जवान’ चित्रपटाची मोफत तिकिटे वाटप करण्यात आली. शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट विवियाना मॉल येथे जितेंद्र आव्हाड यांच्यासह बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिला, असल्याचं सांगितलं जात आहे.

Tags: entertainmentjawanjitendra awhadshahrukh khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Jawan Murali Naik
Social

शेवटचा व्हिडीओ कॉल, मजुरी करणारे वडील अन्…; अवघ्या विशीत वीरमरण आलेल्या मुरली नाईक यांच्या कुटुंबियांचा टाहो, एकुलता एक लेक आणि…

मे 10, 2025 | 2:01 pm
Arijit Singh
Entertainment

मनाचा मोठेपणा! अरिजित सिंगच्या हॉटेलमध्ये सर्वसामांन्यांना इतक्या रुपयांत पोटभर जेवण, गायकाच्या निर्णयाचं कौतुक

मे 10, 2025 | 12:41 pm
akshay kelkar wedding
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

मे 10, 2025 | 11:26 am
Next Post
Nana Patekar on Nepotism in Bollywood

"अतिशय वाईट चित्रपट…", नाना पाटेकरांची बॉलिवूडवर सडकून टीका, म्हणाले, "कुवत नसताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.