‘गदर २’ चित्रपटामुळे चर्चेत आलेला बॉलिवूड अभिनेता सनी देओल एरव्ही त्याच्या खासगी आयुष्याबाबत बोलण्यास टाळतो. मात्र, चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल अनेक माध्यमांना मुलाखती देत असून तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक किस्से व आठवणी सांगताना दिसतोय. असाच एक किस्सा अभिनेत्याने नुकताच शेअर केला आहे. (Sunny Deol on his son Marriage)
अभिनेता सनी देओलचा मुलगा कारण देओल याचं जून महिन्यात लग्न झालं. या लग्नाला संपूर्ण देओल कुटुंबियांसह बॉलिवूड व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. या लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून याची चर्चा त्यावेळी जोरदार रंगली होती. आता मुलाच्या लग्नात त्याच्या घरात व्हिडीओ काढणाऱ्या एका नातेवाईकाला आपण ओरडलो असल्याचा खुलासा सनीने केला आहे.
हे देखील वाचा – ‘जवान’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, पण मोडू शकला नाही ‘गदर २’चा ‘हा’ रेकॉर्ड
सनीने नुकतंच ‘आप की अदालत’ या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने मुलगा करणच्या लग्नातील एक किस्सा सांगितला होता. सनी या सोहळ्यातील फोटोज व व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या काही नातेवाईकांवर नाराज होता. यावर बोलताना तो म्हणाला, “मी माझ्या काही नातेवाईकांवर खूप नाराज होतो, कारण घरात सुरू असलेल्या कार्यक्रमांचे ते व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होते. त्यामुळे मी त्यातील काहींना फटकारत “तुम्हाला लाज नाही वाटत का?” असं मी त्यांना म्हणालो.”
हे देखील वाचा – “…म्हणून मला नग्न केलं”, मराठी सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “ते खूप अपमान…”
“खरंतर हे बघून मला राग आला होता. पण नंतर कळलं, की लग्नासाठी आलेला प्रत्येकजण व्हिडीओ रेकॉर्डिंग करत आहे आणि सर्वांना थांबवणं शक्य नाही. त्यामुळे मग दिवसाच्या शेवटी मी म्हणालो, ‘असू द्या, मी याबद्दल काहीही करू शकत नाही’,” असं त्याने सांगितलं आहे. तर, “सोशल मीडिया आल्यापासून सर्व बेरोजगार लोकांच्या हातात एक साधन आले आहे. ते सर्व खोट्या आयडीवरून त्यांना हवे ते बोलू शकतात. ते लोकांना कसे त्रास देतात याचा विचार करत नाहीत, ते फक्त स्वतःबद्दल विचार करतात.”, असं सनी सोशल मीडियाबद्दल बोलताना म्हणाला.