गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिच्याशिवाय कसं जगता येईल?”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिज्ञा भावेची भावुक पोस्ट, म्हणाली, “ती असताना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 12, 2023 | 11:40 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Abhidnya Bhave Emotional Post

"हिच्याशिवाय कसं जगता येईल?", जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिज्ञा भावेची भावुक पोस्ट, म्हणाली, "ती असताना…"

प्रत्येक कलाकार मंडळींना त्यांच्या खासगी आयुष्यातील जवळच्या व्यक्ती कायमच प्रिय असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या आवडत्या व जवळच्या व्यक्तींबद्दल सोशल मीडियावरून फोटो देखील शेअर करत असतात. कित्येकदा त्यांच्या आवडीनिवडी ही ते पोस्ट शेअर करत सांगत असतात. सोशल मीडियावर अशीच सक्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. आजवर अभिज्ञाने तिच्या अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. इतकंच नव्हे तर मराठीसह अभिज्ञाने हिंदी सिनेसृष्टीतही नाव कमावलं आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रकाशझोतात आलेली अभिज्ञा कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. अलीकडेच अभिज्ञाच्या आजीचं निधन झालं असल्याची पोस्ट तिने सोशल मीडियावरून शेअर केली होती. (Abhidnya Bhave Emotional Post)

अभिज्ञाच तिच्या आजीसोबत स्पेशल बॉण्डिंग होत. अभिज्ञाच्या आजीने यायच्या ९३व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. निधनानंतर अभिज्ञाने आजीबरोबरचा फोटो शेअर करत “मी माझ्या एकमेव सर्वात मोठ्या चाहतीला खूप मिस करेन” असं म्हटलं होतं. अभिज्ञा भावेच्या आजीचं नाव प्रमिला भावे असं होत. यानंतर आता अभिज्ञाने आजीच्या आठवणीत भावुक होत एक कविता शेअर केली आहे. सोबत तिने आजीसोबतचा एक गोड फोटोही शेअर केला आहे.

आणखी वाचा – “…म्हणून मला नग्न केलं”, मराठी सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “ते खूप अपमान…”

फोटोसह शेअर केलेली कविता साऱ्यांच्या मनाला स्पर्शून जात आहे. यांत तिने म्हटलं आहे की, “प्रिय आजी, माणसाच्या सहवासाची किती सवय लागते नाही? एक दिवस ती नसेल या विचाराचा विसरच पडतो. ती असताना नकोशी झालेली बडबड, ती नसताना हवीहवीशी वाटू लागते. कधीकधी सहवासात खूप वर्ष गेली असं वाटतं आणि तिच्या नसण्यात एक क्षणही वर्षासारखा वाटू लागतो. असं वाटतं की, हिच्याशिवाय कसं जगता येईल? पण, तिचा निरोप घेताच भूक लागते, तहान लागते. “

View this post on Instagram

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

“एखादा प्रसंग बघून हसूही येतं. तिच्या आठवणींचे गोड गोफ आपण विणू लागतो. हळूहळू तिच्या आठवणीत रमायला आणि हसायलाही शिकतो. कधीकधी आश्चर्य वाटतं, माणूस हा किती विचित्र आहे ना? मी तिच्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणणार, ती गेल्यावर तिच्या नसण्यात आपलं असणं शोधायला लागतो. तुझी प्रिय सोनू” असं म्हणत अभिज्ञाने कविता शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

आणखी वाचा – “आजूबाजूला सुंदर निसर्ग असूनही…”, प्रसाद ओकने शेअर केला गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाला, “मोबाईलमध्ये…”

अभिज्ञाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी कमेंट करत तिच्या आजीला श्रद्धांजली दिली आहे.

Tags: abhidnya bhaveabhidnya bhave emotinal postentertainmentmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Gashmeer Mahajani Reaction

चाहत्याने छत्रपती संभाजी महाराजांबरोबर गश्मीर महाजनीची केली तुलना, अभिनेता म्हणतो, "माझ्यामध्ये त्यांच्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.