बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच संपूर्ण देशभरात याची चर्चा चालू होती. पण हा चित्रपट आल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात याच्याच नावाचे वारे वाहू लागले आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सगळीकडे या चित्रपटाची वेगळीच हवा आहे. पहिल्याच दिवशी पहिलाच शो पाहण्यासाठी शाहरुखच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. सुरुवातीपासूनच या चित्रपटाने समीक्षकांच्या मनावर जादू केली होती. आताही या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच जात आहे. (jawan movie box office collection)
या चित्रपटाने हिंदीतील सर्वात मोठ्या ओपनिंगचा विक्रम मोडला. त्याचबरोबर त्याने चौथ्या दिवशी व पहिल्या रविवारी बंपर कमाईचाही विक्रम मोडला आहे. एटली दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच रविवारी बंपर कमाई केली. चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तर चक्क ‘जवान’च्या रुपात वादळच आलं होते. जवानच्या कमाईबाबतचे अफडेट नेहमी वेबसाइटवर शेअर केली जात आहेत.
जवान ने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पण त्याने नवीन विक्रम केला तो चौथ्या दिवशी. रविवारच्या दिवशी त्याने सगळे विक्रम मोडत स्वतःचा नवा विक्रम केला. सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाने ८१ कोटींची कमाई केली, जी पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेपेक्षा जास्त होती. किंग खानच्या रविवारच्या कमाईचा आकडा हा त्याच्या आत्तापर्यंतच्या सर्व चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईला मागे टाकत आहे. त्याचबरोबर त्याने दाक्षिणात्य तसेत बॉलिवूडमधील सर्वच सिनेमांना मागे टाकले आहे.
चार दिवसांत या चित्रपटाने देशभरात एकूण २८७ कोटींची कमाई केली आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ३ दिवसांतच ही किंमत वसूल केली. जगभरातही ‘जवान’चा डंका वाजत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४७० कोटींचे कलेक्शन केले. परदेशात १३७.१९ कोटी रुपये कमवले आहे. पहिल्या तीन दिवसात वर्ल्डवाइड ३८४.६९ कोटींची कमाई केली आहे. ‘जवान’ चित्रपटाची तर चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ पहायला मिळाली. चित्रपटगृहांपासून ते रस्त्यांपर्यंत लोक शाहरुख व ‘जवान’चे पोस्टर घेऊन चित्रपटाच्या गाण्यावर नाचताना दिसले. ट्विटरवर वेगवेगळ्या हॅशटॅग वापरून ‘जवान’चा वेगळा ट्रेंड तयार केला जात आहे. या चित्रपटाने फक्त सर्वसामान्यांनाच नाही तर बॉलिवूडपासून साऊथपर्यंत सगळ्या दिग्गजांना प्रभावित केलं आहे. सध्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांच्या ओठावर ‘जवान’ चित्रपटाचं नाव आहे.