दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. सिंहगडाची लढाई आणि नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पूर्ण केल्या आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून चित्रपटातील प्रत्येक सीन प्रेक्षकांचे मने जिंकून घेत आहे. आता चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. चित्रपटाने तीन दिवसांत कोट्यवधींची कमाई केली आहे. (Subhedar Movie Box Office Collection)
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून ‘सुभेदार’ला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज हाऊसफुल असल्याचे दिसून येत आहे. अशातच चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले असून तीन दिवसांत चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. ट्रेंड अनॅलिस्ट तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाहिल्या दिवशी १ कोटी १५ लाखांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी १ कोटी ६९ लाख, तर तिसऱ्या दिवशी तब्बल २ कोटी २२ लाखांची कमाई केली आहे. म्हणजे या तीन दिवसांत ५ कोटी ६ लाखांचा गल्ला चित्रपटाने जमवला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता जास्त आहे.
हे देखील वाचा – Video : डॉ.सलील कुलकर्णींनी शेअर केला सेलिब्रेशनचा खास व्हिडिओ म्हणाले, “राष्ट्रीय पुरस्काराच्या सेलिब्रेशनला सुरुवात…”
‘SUBHEDAR’ WINS HEARTS, CONQUERS BOXOFFICE… Director #DigpalLanjekar’s #Marathi film #Subhedar scores EXCELLENT numbers in its opening weekend… Fri 1.15 cr, Sat 1.69 cr, Sun 2.22 cr. Total: ₹ 5.06 cr.
— taran adarsh (@taran_adarsh) August 28, 2023
Presented by AA Films and Everest Entertainment. pic.twitter.com/IeOdcSKqO0
चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे आदी प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटात सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. सोशल मीडिया व माऊथ पब्लिसिटीद्वारे चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणाली, “नवी सुरुवात आणि…”
त्याचबरोबर थरारक सीन्स, गाणी व उत्तम दिग्दर्शन यांमुळे ‘सुभेदार’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट कमाईचे रेकॉर्डस् मोडणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Subhedar Movie Box Office Collection)