रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“याच्या केसांना धक्का कोणी लावला?”, गौरव मोरेने  केस कापल्यानंतर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट, समीर चौघुले म्हणाले, “हास्यजत्रेत…”  

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 21, 2023 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gaurav more new look

“याच्या केसांना धक्का कोणी लावला?”, गौरव मोरेने केस कापल्यानंतर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट, समीर चौघुले म्हणाले, “हास्यजत्रेत...”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने जवळपास दोन महिन्यांसाठी ब्रेक घेतला होता. यादरम्यान या कार्यक्रमातील कलाकार परदेशात गेले होते. परदेशात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे काही शो झाले. तिथेही या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांना हसवण्यास तयार झाली आहे. कार्यक्रमातील कलाकारांना पाहून प्रेक्षकही आनंदी झाले आहेत. आता यामधीलच एका कलाकाराची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे विनोदी कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. गौरव मंचावर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवतो. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात तो यशस्वी ठरला. त्याच्या केसांची स्टाइल तर आता जगप्रसिद्ध झाली आहे. पण आता गौरवची ही स्टाइल प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. कारण त्याने स्वतः केस कापले आहेत. त्याचा नवा लूक आता समोर आला आहे.

आणखी वाचा – ‘जाणता राजा’साठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज देण्यास अशोक सराफ यांचा नकार, खुलासा करत म्हणाले, “तेवढी माझी कुवत नाही कारण…”

समीर चौघुलेंनी गौरवचा नव्या लूकमधील फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला. हा फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. गौरवचे केस यामध्ये कापलेले दिसत आहे. तसेच त्याच्या कानामध्ये बाळी दिसत आहे. समीर यांनी हा फोटो शेअर करत म्हटलं की, “आमच्या हास्यजत्रेत नवीन अभिनेत्याचे पदार्पण”.

आणखी वाचा – खुशबू तावडेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार, म्हणाली, “मी मुळची कोकणातली म्हणून…”

View this post on Instagram

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

समीर यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एमएचजे टीम असताना गौरवच्या केसाला धक्का कोणी लावला?, गौरवरचे कान पहिल्यांदा पाहिले, गौरवने केस का कापले?, म्हणजे तुम्हाला स्किटसाठी विषय मिळाला, माणसात आल्यासारखा वाटतो अशा विविध कमेंट चाहत्यांनी केल्या. आता गौरव स्किटमध्ये केस उडवताना दिसणार नसल्याची चाहत्यांना खंत आहे. पण त्याचा हा नवीन लूक व नवी भूमिका पाहणं तितकंच रंजक ठरणार हे नक्की.

Tags: gaurav moremaharashtrachi hasy jatramarathi actormarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
Next Post
Apurva Nemlekar New Serial

‘रात्रीस खेळ चाले’नंतर अपूर्वा नेमळेकरची नवी मालिका येणार, भूमिकेसाठी वजनही कमी केलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.