अभिनेत्री राखी सावंत व तिचा पती आदिल खान दुर्रानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राखीने केलेल्या आरोपानंतर आदिलला पोलिसांनी जेलमध्ये ठेवलं होतं. मात्र आता आदिल खान दुर्रानी जेलमधून सुटून बाहेर आला असून त्याला मुंबईत पापाराझींनी पाहिलं आहे. इटाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आदिल खानने काही मीडिया व्यक्तींशी ही संवाद साधला. यावेळी आदिलने राखी व तिच्या लोकांकडून त्याला ‘फ्रेम’ कसे केले गेले याबाबत त्याने भाष्य केलं. (Adil Khan Durrani On Rakhi Sawant)
इटाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आदिलला काही पत्रकारांनी शहरात पाहिले. या पत्रकारांनी आदीलला राखी सावंतने केलेल्या आरोपांवर उत्तर देण्यास सांगितले, तेव्हा आदिल म्हणाला, माझ्यासोबत खूप वाईट घडलं आहे. मी काही दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे.
यापुढे बोलताना आदिल खान म्हणाला, “माझ्यासोबत हे का आणि कोणत्या कारणामुळे घडले ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. मी माझ्या बाजूने सत्य सांगणार आहे. आणि यासाठी मी आज उद्यामध्ये लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सत्याचा उलगडा करणार आहे. मला कसे फ्रेम केले गेले ते मी सांगणार आहे. मला चूक ठरवण्यात राखीसोबत इतर काही लोकही सामील होते. माझे काय झाले ते तुम्हाला कळेल. माझ्याकडून करोडो रुपये द्यायचे आहेत की नाही हे ही तुम्हाला समजेल”.

राखी सावंतने पती आदिल खानवर गंभीर आरोप करत पोलिसात केस दाखल केली होती. राखीने दावा केला की तिची पैशांची फसवणूक करण्यासोबतच आदिलने तिचे अडल्ट व्हिडिओही बनवले. म्हैसूरमधील एका महिलेने आदिलवर छेडछाडीचा आरोपही केला होता. त्यामुळे आदिल अनेक महिने तुरुंगात राहिला.
राखी सावंतने मे २०२२ मध्ये आदिल खान दुर्रानीसहा लग्न केले. मात्र हे लग्न लपवून ठेवत राखीने ७ महिन्यांनंतर जानेवारी २०२३ मध्ये तिच्या लग्नाची घोषणा केली. आदिलसोबत लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला. तसेच इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तिने तिचे नाव बदलून फातिमा नाव ठेवल्याचा खुलासाही राखीने केला होता.