Aashok Shinde Sara Kahi Tichyasathi काही कलाकार हे आज ही तरुण कलाकार मंडळींना मात देतील इतके फिट असतात. त्यांच्या अभिनयाचे जितके चाहते असतात, तितकंच कौतुक प्रेक्षकांना त्यांच्या फिटनेसचं देखील असतं. असेच एव्हरग्रीन अभिनेते म्हणजे अशोक शिंदे.अनेक वर्ष अशोक प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करत आहेत. तरी आज ही तोच उत्साह आणि तोच चार्म त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो.(Aashok Shinde Sara Kahi Tichyasathi)
सतत वेगवगळ्या भूमिकांमधून अशोक प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.’माझे पती सौभाग्यवती’ मालिकेनंतर जवळजवळ ८ वर्षांनंतर अशोक पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर दिसणार आहेत.’सारं काही तिच्यासाठी’ या नव्या मालिकेत अशोक महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘सारं काही तिच्यासाठी’ ही अशोक यांची १०६वी मालिका आहे.मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत, मालिकेचे प्रमोशन देखील जोरदार सुरु आहे. त्याला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतं आहे.
जाणून घ्या ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील अभिनेते अशोक शिंदे यांच्या भूमिकेविषयी (Aashok Shinde Sara Kahi Tichyasathi)
इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अशोक यांनी त्यांच्या नव्या भूमिकेविषयी भाष्य केले आहे. अशोक म्हणाले, “मालिकेत खलनायक किंवा खलनायिका नाही आहे. परिस्थिती नुसार येणारी वळण आणि त्याचे परिणाम यामाध्यमातून कथा पुढे जाणार आहे”.अशोक ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत रघुनाथ खोत ही भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री खुशबू तावडे म्हणजे मालिकेतील मोठी बहीण उमा हिच्या पतीच्या भूमिकेत अशोक दिसणार आहेत.
हे देखील वाचा : ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर ‘बाईपण भारी देवा’च्या टीमची मंगळागौर, ‘नाच गं घुमा’ म्हणत प्रेक्षकांनाही नाचवलं, व्हिडिओ व्हायरल
“रघुनाथ खोत अत्यंत संयमी व स्वदेशी जपणारा माणूस आहे.खूप मेहनतीने त्याने एक ऐश्वर्य उभं केलं आहे.सध्या दिसताना असं दिसतंय की रघुनाथ छळवादी किंवा हुकूमशाही गाजवणारा नवरा आहे, पंरतु तस नाही आहे.रघुनाथ अत्यंत प्रेमळ माणूस आहे.पंरतु रघुनाथ असं काही तरी करतो ज्यामुळे दोन बहिणींना वेगळं व्हावं लागतं.” असं अशोक म्हणाले. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आज पासून म्हणजेच २१ ऑगस्टपासून ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री खुशबू तावडे व शर्मिष्ठा राऊत या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Sara Kahi Tichyasathi New Serial)