शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला चुकीचं ठरवण्यात राखीसह…”, राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या पतीची तुरुंगातून सुटका, म्हणाला, “कोट्यवधी रुपये…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 21, 2023 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Adil Khan Durrani On Rakhi Sawant

“मला चुकीचं ठरवण्यात राखीसह…”, राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या पतीची तुरुंगातून सुटका, म्हणाला, “कोट्यवधी रुपये…”

अभिनेत्री राखी सावंत व तिचा पती आदिल खान दुर्रानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राखीने केलेल्या आरोपानंतर आदिलला पोलिसांनी जेलमध्ये ठेवलं होतं. मात्र आता आदिल खान दुर्रानी जेलमधून सुटून बाहेर आला असून त्याला मुंबईत पापाराझींनी पाहिलं आहे. इटाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आदिल खानने काही मीडिया व्यक्तींशी ही संवाद साधला. यावेळी आदिलने राखी व तिच्या लोकांकडून त्याला ‘फ्रेम’ कसे केले गेले याबाबत त्याने भाष्य केलं. (Adil Khan Durrani On Rakhi Sawant)

इटाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आदिलला काही पत्रकारांनी शहरात पाहिले. या पत्रकारांनी आदीलला राखी सावंतने केलेल्या आरोपांवर उत्तर देण्यास सांगितले, तेव्हा आदिल म्हणाला, माझ्यासोबत खूप वाईट घडलं आहे. मी काही दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे.

यापुढे बोलताना आदिल खान म्हणाला, “माझ्यासोबत हे का आणि कोणत्या कारणामुळे घडले ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. मी माझ्या बाजूने सत्य सांगणार आहे. आणि यासाठी मी आज उद्यामध्ये लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सत्याचा उलगडा करणार आहे. मला कसे फ्रेम केले गेले ते मी सांगणार आहे. मला चूक ठरवण्यात राखीसोबत इतर काही लोकही सामील होते. माझे काय झाले ते तुम्हाला कळेल. माझ्याकडून करोडो रुपये द्यायचे आहेत की नाही हे ही तुम्हाला समजेल”.

हे देखील वाचा – अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार? सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा, म्हणाले, “त्यांच्या नावाची शिफारस मी…”

राखी सावंतने पती आदिल खानवर गंभीर आरोप करत पोलिसात केस दाखल केली होती. राखीने दावा केला की तिची पैशांची फसवणूक करण्यासोबतच आदिलने तिचे अडल्ट व्हिडिओही बनवले. म्हैसूरमधील एका महिलेने आदिलवर छेडछाडीचा आरोपही केला होता. त्यामुळे आदिल अनेक महिने तुरुंगात राहिला.

हे देखील वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत अशोक शिंदे दिसणार मुख्य भूमिकेत, म्हणाले,”छळ करणारा नवरा नव्हे तर…”

राखी सावंतने मे २०२२ मध्ये आदिल खान दुर्रानीसहा लग्न केले. मात्र हे लग्न लपवून ठेवत राखीने ७ महिन्यांनंतर जानेवारी २०२३ मध्ये तिच्या लग्नाची घोषणा केली. आदिलसोबत लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला. तसेच इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तिने तिचे नाव बदलून फातिमा नाव ठेवल्याचा खुलासाही राखीने केला होता.

Tags: Adil Khan Durranirakhi sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Actress Shilpa Shared Behind the Scenes

Video : …अन् रेल्वेस्थानकार डान्स करत राहिल्या ‘बाईपण भारी देवा’मधल्या अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.