शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठी कार्यक्रमात आपण हिंदी कलाकारांचं प्रमोशन करतो पण…”, केदार शिंदेंची खंत, म्हणाले, “आपल्याला हिंदीत…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 21, 2023 | 5:40 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Team Baipan Bhari Deva in India's Best Dancer Show

"आम्ही फक्त तुमचे…" हिंदी रिॲलिटी शोच्या मंचावर अवतरली 'बाईपण भारी देवा'ची टीम, केदार शिंदे म्हणाले, "मराठी चित्रपट जेव्हा त्यांच्या व्यासपीठावर…"

एकीकडे बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडचे दोन बहुचर्चित चित्रपट कोटींची कमाई करत असताना एक मराठी चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. तो म्हणजे, दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’. मराठीसह हिंदी प्रेक्षक व समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे बॉलीवूडमधील अनेक कलाकार मंडळी भरभरून कौतुक करताना दिसत आहे. (Baipan Bhari Deva)

एकीकडे चित्रपटाची देश-विदेशात चर्चा होत असतानाच ‘बाईपण भारी देवा’च्या संपूर्ण टीमने एका प्रसिद्ध हिंदी रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. दिग्दर्शक केदार शिंदेसह ‘बाईपण भारी देवा’ मधील कलाकार वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब हे प्रसिद्ध हिंदी टीव्ही रिॲलिटी शो “इंडियाज बेस्ट डान्सर”च्या मंचावर अवतरली होती. यावेळी शोचे परीक्षक सोनाली बेंद्रे, गीता कपूर व टेरेन्स लुईस हे चित्रपटातील कलाकारांसोबत ‘बाईपण भारी देवा’च्या गाण्यावर थिरकले.

हे देखील वाचा – “लक्ष्मीकांत गेल्यानंतर मला…”, ‘तो’ प्रसंग सांगताना प्रिया बेर्डेंना रडू कोसळलं, म्हणाल्या, “आई-वडिलांचंही निधन झालं अन्…”  

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती आपल्या चाहत्यांसमोर शेअर केली. या पोस्टवर दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “काल सोनी टीव्हीच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमात ‘बाईपण भारी देवा’च्या टीमला खास निमंत्रित केलं होतं. फारच अभिमान वाटतो. मराठी चित्रपट जेव्हा त्यांच्या व्यासपीठावर जाऊन आपला डंका वाजवतो, तेव्हा ऊर भरून येतो. मला वाटतं याआधी सैराट चित्रपटाच्या टीमला ‘कपिल शर्मा शो’ साठी बोलवलं गेलं होतं. आपल्या मराठी कार्यक्रमात हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो मात्र हे आपल्या बाबतीत हिंदीत फार होताना दिसत नाही. याचं शल्य मनात नक्कीच आहे. ‘बाईपण भारी देवा’चं संपुर्ण यश हे तुम्हा मायबाप प्रेक्षकांचं आहे. आम्ही फक्त तुमचे प्रतिनिधी आहोत.”

हे देखील वाचा – बहुचर्चित ‘अंकुश’ ॲक्शनपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित, प्रेक्षकांना पाहायला मिळणार अंकुश आणि रावीची हृदयस्पर्शी प्रेमकथा

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

सहा बहिणींभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकाला जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने आतापर्यंत ७५ कोटींची कमाई केली असून चित्रपटाची सध्या १०० कोटीच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. (Team Baipan Bhari Deva in India’s Best Dancer Show)

Tags: baipan bhari devaindia's best dancerkedar shinde
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
jitendra joshi angry

"हा निर्लज्जपणा येतो कुठून?", रीलसाठी कवितांचा वापर करणाऱ्यांवर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, "त्याचीच कविता…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.