रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी निधन, कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यूने गाठलं अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 19, 2023 | 12:13 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Tamil TV Actor Pawan Passed Away

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी निधन, कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यूने गाठलं अन्...

कलाक्षेत्रामध्ये अगदी तरुण वयात जगाचा निरोप घेणाऱ्या कलाकारांमध्ये आता वाढ झाली आहे. कलाक्षेत्रासाठीही ही अगदी दुःखद बाब आहे. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. सुप्रिसद्ध दाक्षिणात्या अभिनेता पवन सिंहचं निधन झालं आहे. तो फक्त २५ वर्षांचा होता. पवनच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे पवनचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी (१८ ऑगस्ट) मुंबईमधील राहत्या घरी पवनने अखेरचा श्वास घेतला. तो कर्नाटकमधील मांड्या जिल्ह्याचा रहिवाशी होता. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, पवनचं पार्थिव मांड्या येथील त्याच्या घरी नेण्यात येणार आहे. त्याचे काही कुटुंबीय कर्नाटकमध्येच आहेत. त्यांच्या उपस्थितीतीच पवनच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.

आणखी वाचा – Video : “पुरुषांवर संस्कार…”, सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा मुलगा शिकतोय स्वयंपाक, बनवली चपाती

कामानिमित्त पवन त्याच्या कुटुंबियांना घेऊन मुंबईमध्ये राहत होता. त्याने आजवर हिंदी तसेच तमिळ मालिकांमध्ये काम केलं आहे. अगदी तरुण वयामध्ये पवनला मृत्यूने गाठल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अचानक जाण्याने कलाक्षेत्रासह कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे पवनचं निधन झालं असल्याची माहिती आहे. पण याशिवाय इतर कोणत्याच गोष्टीबाबत पवनच्या कुटुंबियांकडून माहिती देण्यात आलेली नाही.

आणखी वाचा – फुफ्फुसं ८०-८५ टक्के निकामी, गंभीर आजार, शस्त्रक्रिया अन्…; विद्याधर जोशींना झालेला गंभीर आजार खुलासा करत म्हणाले, “जगातून गेल्यानंतर…”

बऱ्याच राजकीय मंडळींनी पवनला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच चाहत्यांकडूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियाद्वारेही पवनचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. पवनच्या आधी दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्रच्या पत्नी स्पंदनाचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर विजय कोलमडून गेला आहे. आता पवनच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी हादरली आहे.

Tags: entertainment newssouth actorsouth industry
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kartiki Gaikwad Shares Goodnews

Video : वडिलांनी पूजा केली, केक कापला अन्…; कार्तिकी गायकवाडने खरेदी केली महागडी कार, म्हणाली, “कुटुंबातील नवीन…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.