बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. अक्षय कुमारचा ‘OMG २’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, त्याला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. हे सर्व सुरु असताना आजचा दिवस मात्र अक्षयसाठी विशेष ठरला आहे. कारण देशाच्या स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारला आज भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे अक्षय कुमार आता देशाचा नागरिक झालेला आहे. (Akshay Kumar)
अभिनेता अक्षय कुमारकडे याआधी कॅनडाचे नागरिकत्व होते, यामुळे तो सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर यायचा. २०१९ पासून अक्षय भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. भारतीय पासपोर्टसाठीसुद्धा त्याने अर्जदेखील केला होता. मात्र, कोरोनामुळे या प्रक्रियेस विलंब झाला होता. अखेर त्याला आज भारतीय नागरिकत्व मिळाले असून त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.
अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात त्याच्या हातात भारतीय नागरिकत्वाचे सर्टिफिकेट दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना अक्षय म्हणतो, “मन आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्थानी. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!” अक्षयच्या या पोस्टवर कलाकारांनी अभिनंदन केले असून अक्षयच्या भारतीय नागरिकत्वामुळे ट्रोलर्सची तोंड कायमची बंद झाली असल्याचे कमेंट्स त्याचे चाहते करत आहे.
हे देखील वाचा – बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड स्पर्धक एल्विश यादवने मारली माजी, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला, “सिस्टीम…”
Dil aur citizenship, dono Hindustani.
— Akshay Kumar (@akshaykumar) August 15, 2023
Happy Independence Day!
Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/DLH0DtbGxk
अभिनेता अक्षय कुमारकडे सुरुवातीला भारतीय नागरिकत्व होते. मात्र बॉक्स ऑफिसवर सलग १४ चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याने मित्राच्या सल्ल्यानुसार कॅनडाला स्थलांतरित होऊन तिथल्या नागरिकत्व स्वीकारले. पण काही काळानंतर तो भारतात परतला, आणि तो बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक ठरला.
हे देखील वाचा – हिंदी सिनेमांना बॉलिवूड म्हणण्यावर सनी देओलने घेतला आक्षेप, स्पष्टचं म्हणाला, “हिंदुस्थान…”
दरम्यान, अक्षय कुमार देशात सर्वाधिक कर भरायचा, त्यामुळे तो नेहमीच करदात्यांच्या यादीत वरच्या स्थानावर असायचा. असे असताना सुद्धा कॅनडाच्या नागरिकत्वावरून तो नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत होता. मात्र आता अक्षय कुमार अधिकृतपणे भारताचा नागरिक बनला आहे. (Akshay Kumar got Indian Citizenship)