‘ताली’ या वेब सीरिजचा नुकताच ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे. या वेब सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर झळकणार आहेत. नाटक, मालिका, सिनेमा या तिन्ही माध्यमांत त्यांनी कामे केली आहेत. त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ऐश्वर्या यांनी हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. आता ‘ताली’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ऐश्वर्या नारकर या त्यांच्या अभिनयाने आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.(Taali web series)
‘ताली’ या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंतची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ही किन्नरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रान्सजेंडरचे आयुष्य नेमके कसे हे सर्व काही या वेब सीरिजमध्ये दाखवले जाणार आहे. गौरी सावंतने कशाप्रकारे संघर्ष केलाय, याबद्दल देखील या वेब सीरिजमध्ये दाखवले जाणार आहे. ट्रेलरमध्ये सुष्मिता सेन ही संघर्ष करताना दिसत आहे.
हे देखील वाचा “तुला स्टेज वर येऊन मारेन…” उपेंद्र लिमयेंनी प्रवीण तरडेंना दिली होती धमकी, म्हणाले,”तुझी कुवत…”
चाहते आता या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. ‘ताली’ या वेब सीरिजचे ट्रेलर आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण यावर कमेंट करताना देखील दिसत आहेत. युजर्सने ट्रेलरवर बऱ्याच कमेंटस केल्या आहेत. ‘मला सुष्मिता सेन हिचा लूक प्रचंड आवडला आहे.’ ‘अशा विषयांवर वेब सीरिज आणि चित्रपट तयार नक्कीच व्हायला हवेत’ ‘मी काही दिवसांपासून या ताली वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहे.’
रवी जाधव दिग्दर्शित या सीरिजचं लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केलं आहे. ‘ताली’ या वेबसीरिजचे सहा एपिसोड असणार आहेत. तृतीयपंथीयांचा संघर्ष उलगडणाऱ्या या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘ताली’ वेब सीरिज सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. १५ ऑगस्ट रोजी ‘ताली’ वेब सीरिज प्रेक्षकांना जीओ सिनेमावर मोफत पाहता येणार आहे. स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या श्रीगौरी सावंत यांचा प्रवास प्रेक्षकांसमोर येणार आहे.