रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Nitin Desai Funeral : …अन् वडिलांना पाहून लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 4, 2023 | 3:10 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Nitin Desai Funeral Updates in marathi

Nitin Desai Funeral : ...अन् वडिलांना पाहून लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर

Nitin Desai Funeral Update : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कलाविश्वाच हादरुन गेलं. या घटनेनंतर देसाई कुटुंबियांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला. बुधवारी (२ ऑगस्ट) सकाळी एनडी स्टुडिओ येथे गळफास घेत नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. आज एनडी स्टुडिओ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सकाळपासूनच त्यांच्या अंतिम दर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये तुफान गर्दी जमली आहे. यादरम्यानचे बरेच व्हिडीओही आता समोर येत आहेत. कलाविश्वातील या सुप्रसिद्ध कलाकाराला शेवटचा निरोप देताना अनेकांना अश्रु अनावर झाले. तर नितीन देसाईंच्या मुलीचाही एक व्हिडीओ समोर आला आहे.

फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून नितीन देसाईंचं पार्थिव एनडी स्टुडिओमधील ‘जोधा अकबर’च्या सेटवर आणण्यात आलं. याच सेटवर अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. सुबोध भावे, मानसी नाईक, रवी जाधव, अभिजीत केळकर यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.

आणखी वाचा – Nitin Desai Funeral : फुलांची सजावट, तुफान गर्दी अन्…; नितीन देसाईंना पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले, व्हिडीओ व्हायरल

इतकंच नव्हे तर कलाकारांबरोबरच विनोद तावडे, किरीट सोमय्या, उदयनराजे भोसले यांसारखी दिग्गज राजकीय मंडळी एनडी स्टुडिओ येथे पोहोचली आहेत. दरम्यान या गर्दीमध्ये नितीन देसाईंची लेक मानसी देसाईने तिच्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. मानसीला रडताना पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

आणखी वाचा – शेवटचा फोन, चिट्ठी, धनुष्यबाण बनवलं अन्…; नितीन देसाईंच्या कर्मचाऱ्याने सांगितलं संपूर्ण सत्य, म्हणाला, “गळफास घेतलेल्या अवस्थेत…”

पाहा व्हिडीओ

नितीन देसाई यांची पत्नी, जावई व मुलगी अंतिम दर्शनासाठी पोहोचली. यावेळी मानसी तिच्या वडिलांच्या जवळ गेली. वडिलांना पाहत असताना तिला अश्रू अनावर झाले. तर कुटुंबातील इतर मंडळींनाही नितीन देसाईंना या अवस्थेत पाहणं सहन झालं नाही. नितीन देसाईंच्या अचनाक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Tags: nitin desainitin desai suicidenitin desai suicide marathi newsnitin desai suicide news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Director Ravi Jadhav on Nitin Desai Demised

Ravi Jadhav on Nitin Desai: "तेव्हा त्यांनी मला फोन केला अन्…" नितीन देसाईंना अखेरचा निरोप देताना रवी जाधव भावुक, म्हणाले, "मला एनडी स्टुडिओमध्ये बोलावलं होतं कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.