रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शेवटचा फोन, चिट्ठी, धनुष्यबाण बनवलं अन्…; नितीन देसाईंच्या कर्मचाऱ्याने सांगितलं संपूर्ण सत्य, म्हणाला, “गळफास घेतलेल्या अवस्थेत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 3, 2023 | 11:47 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Nitin Desai Suicide Case

शेवटचा फोन, चिट्ठी, धनुष्यबाण बनवलं अन्...; नितीन देसाईंच्या कर्मचाऱ्याने सांगितलं संपूर्ण सत्य, म्हणाला, “गळफास घेतलेल्या अवस्थेत...”

Nitin Desai Suicide Case : सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (२ ऑगस्ट) गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कलाविश्वच हादरुन गेलं. नितीन देसाईंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना सध्या जे.जे. रुग्णालयात ठेवण्यात आलं असून शवविच्छेदनाचा अहवालही समोर आला आहे. त्यांनी आत्महत्याच केली असल्याचं शवविच्छेदन अहवालामधून स्पष्ट झालं. पण नितीन देसाई यांनी जेव्हा गळफास घेतला तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबत एक नवी माहिती आता समोर येत आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत नितीन देसाईंना ज्या कर्मचाऱ्याने पहिल्यांदा पाहिलं त्याने काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

एनडी स्टुडिओचा कर्मचारी मयुर ठोंबरने पहिल्यांदा नितीन देसाई यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. दरम्यान मयुर ठोंबरने ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी मयुर म्हणाला, “नितीन देसाई यांनी एक चिट्ठी लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, माझा अंतिम विधी हा एनडी स्टुडिओमध्येच व्हावा. स्टुडिओमध्येच सहा नंबरच्या ग्राऊंडवर हॅलिपॅड आहे तिथेच नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील”.

आणखी वाचा – “त्याच्याशी बोलायला हवं होतं”, नितीन देसाईंच्या निधनानंतर महेश मांजरेकर भावुक, म्हणाले, “त्याला मी शेवटचं पाहिलं तेव्हा…”

“दादांच्या सुरक्षारक्षकांनाही सुरुवातीला माहित नव्हतं की नेमकं काय घडलं आहे?. आम्ही सुरक्षारक्षकांना विचारलं की, दादा कुठे आहेत?. दादा ऑफिसमध्ये आहेत असं सुरक्षारक्षकांनी आम्हाला सांगितलं. पण दादा ऑफिसमध्ये नव्हते. आम्ही त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. ते दृश्य खूप भयानक होतं. एका कर्मचाऱ्याला त्यांनी सांगितलं होतं की, तू सकाळी साडे आठ वाजता माझ्या ऑफिसमध्ये ये. रेकॉर्डरवर मी काही गोष्टी रेकॉर्ड केल्या आहेत त्या तपास. दादा बुधवारी (१ ऑगस्ट) रात्री दोन वाजता दिल्लीवरुन आले होते असं त्यांचे सुरक्षारक्षक सांगतात”.

आणखी वाचा – एनडी स्टुडिओमध्येच बांधलेल्या घरामध्ये मुक्काम, कर्मचाऱ्यांशी संवाद अन्…; नितीन देसाईंच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं?

View this post on Instagram

A post shared by ND's Film World (@ndsfilmworld)

पुढे मयुर म्हणाला, “रेकॉर्डर आम्हाला मिळाला. आम्ही पूर्ण रेकॉर्डिंग ऐकली नाही. आम्ही तो रेकॉर्डर लगेचच पोलिसांच्या ताब्यात दिला. ‘मराठी पाऊल पडते पुढे’चं ज्या सेटवर चित्रीकरण झालं तिथेच त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी दोरीने धनुष्यबाणाचं चिन्ह तयार केलं. त्या धनुष्यबाणाच्या टोकावर उभं राहून त्याच जागी त्यांनी आत्महत्या केली. मी जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा सर्वप्रथम माझं त्या धनुष्यबाणाकडेच लक्ष गेलं. हे धनुष्यबाण तुम्ही बनवलं आहे का? असं आम्ही तिथल्या काही कर्मचाऱ्यांनाही विचारलं. पण त्यांनी नाही असं उत्तर दिलं. दादांनीच ते धनुष्यबाण बनवलं असल्याचं लोक म्हणत आहेत. सकाळी ९.३०च्या सुमारस पोलिस आले”. एनडी स्टुडिओमध्येच नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: nitin desaiNitin Desai commits suicide in karjat studionitin desai suicidenitin desai suicide marathi news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Gautami patil statement

"…तर मी नाचणं सोडेन" कार्यक्रमादरम्यान दगडफेक झाल्यानंतर गौतमी पाटीलचा संताप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.