छोट्या पडद्यावरील मालिका आणि त्या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना प्रेक्षक अगदी डोक्यावर उचलून धरतात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेची लोकप्रियता तर आजवर साऱ्यांनीच अनुभवली. गेली कित्येक वर्ष ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करणारे बालकलाकारांचं तर आता लग्न झालं आहे. तर कोणी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर झाले आहेत. मालिकेतील काही पात्र अजूनही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून प्रेक्षकांना हसवत आहेत. मालिकेतला सोसायटीमध्ये विविध क्षेत्रात काम करणारी माणसं राहतात. यांची कमाई व पगार नक्की किती असेल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?. याचबाबत आज आपण सविस्तर बोलणार आहोत. (taarak Mehta ka ooltah chashmah actors)
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील पोपटलाल, भिडे, हत्तीभाई, जेठालाल, अय्यर, सोढी नक्की किती कमावत असतील? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्याचबाबत काही आकडे समोर आले आहेत. या पात्रांच्या कमाईबाबत प्रेक्षकही चर्चा करतात. त्याचबाबत सविस्तर माहिती…
भिडे
भिडे (मंदार चांदवडकर) ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील महत्त्वाचं पात्र. मालिकेतील इतर व्यक्तींपेक्षा कमी कमाई असलेला व्यक्ती म्हणजे भिडे. क्लास घेत महिन्याला साधारणतः तो ४२ हजार रुपये कमाई करत असावा. तर त्याची पत्नी माधवी (सोनालिका जोशी) लोणचं-पापडचा व्यवसाय करुन १० ते १५ हजार कमावत असल्याची शक्यता आहे असं चाहते म्हणतात.
डॉ. हाथी
डॉ. हाथीचं (निर्मल सोनी) गोकुळधाम सोसायटीमध्ये स्वतःचं क्लिनिक आहे. ते या व्यवसायातून महिन्याला ३० ते ४० हजार कमाई करत असतील असं चाहत्यांचं म्हणणं आहे. हाथीच्या मुलाची व पत्नीचं राहणीमान पाहता त्यांचा या व्यतिरिक्तही व्यवसाय आहे अशी प्रेक्षकांना शंका आहे.
पोपटलाल
पोपटलाल (श्याम पाठक) नामांकित पत्रकार आहे. इतर पत्रकारांचा माहित असलेला पगार पाहता प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार त्याचा पगार ५० हजार रुपये असू शकतो. म्हणूनच त्याची चिडचिड होते असं चाहत्यांचं म्हणणं आहे.
अय्यर
अय्यर हा एक शास्त्रज्ञ आहे. चाहत्यांना स्क्रिप्टनुसार असं वाटतं की, त्याचा पगार दीड ते दोन लाखांच्या घरात असावा. इतर प्रेक्षकांनी इतर शास्त्रज्ञांच्या तुलनेत ही सरासरी काढलेली आहे.
सोढी
सोढीचं तर स्वतःचं गॅरेज आहे. सोसायटीमधल्या श्रीमंत व्यक्तींपैकी सोढी असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. त्याची कमाई दीड ते दोन लाख रुपये असू शकते.
तारक मेहता
तारक मेहता नामांकित लेखक आहे. त्यांची लिखानाची शैली, प्रसिद्धी पाहता महिन्याला दोन लाख कमावत असणार असं प्रेक्षक म्हणतात. ही संपूर्ण सरासरी त्यांच्या स्क्रिप्टनुसार व कामानुसार प्रेक्षकांनी काढलेली आहे. विविध अंदाज वर्तवले आहेत.
आणखी वाचा – “माझे स्तन तिच्याएवढे नाहीत आणि…”, नीना गुप्तांची सुप्रसिद्ध अभिनेत्रीबाबात धक्कादायक वक्तव्य, त्यांनी थेट…
जेठालाल
जेठालाल व त्याचं कुटुंब हे गोकुळधाममधील महत्त्वाचं कुटुंब आहे. त्याचा स्वतःचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय आहे. स्वतःचं दुकान आहे. त्यामुळे त्याची कमाई पाच ते सहा लाख असू शकते असं प्रेक्षक म्हणतात. गोकुळधाम सोसायटीच्या रहिवाशांची कमाई ऐकून खरंच गंमत वाटते.