सोशल मीडियाची ताकद नक्की काय आहे? हे सामान्य माणसांसह कलाकार मंडळी अधिकाधिक अनुभवतात. ओटीटी प्लॅटफॉर्म, युट्यूबद्वारे सुरु असणाऱ्या वेबसीरिजला तर प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. त्यातीलच एक वेबसीरिज म्हणजे ITSMAJJA ची ‘दहावी अ’. ‘आठवी अ’ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘दहावी अ’चा जन्म झाला. वेबसीरिजमधील कलाकारांनी तर अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं. या कलाकारांचा चाहतावर्ग तर फार मोठा आहे. सध्या ‘दहावी अ’चे कलाकार मुंबई दर्शन करत आहेत. त्यादरम्यान त्यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. (dahavi a webseries actor Mumbai trip)
‘दहावी अ’ची मुलं काही दिवसांपूर्वीच मुंबईत आली आहे. मुंबई आल्यानंतर प्रथम त्यांनी सिद्धीविनायकचे दर्शन घेतलं. त्यानंतर ही मंडळी मुंबईतील विविध ठिकाणी गेली. स्वप्नांच्या नगरीत त्यांनी प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. पण त्यांचं एक स्वप्न सत्यात उतरलं. ते स्वप्न म्हणजे ‘दहावी अ’ची मंडळी थेट गुगल ऑफिसमध्ये पोहोचले. गुगल ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी युट्युब सेक्शनला भेट दिली. तिथे त्यांनी मजेशीर गप्पा मारल्या.
आणखी वाचा – ‘दहावी अ’च्या कलाकारांची जीवाची मुंबई, Snow World मध्ये मस्ती ते जुहू बीचवर खाण्यासाठी मारला ताव
गुगल ऑफिसची सफर करत असताना त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथेच त्यांनी जेवणही केलं. विविध गेम्स मुलांना खेळता आले. शिवाय वर्षाच्या शेवटाकडे ITSMAJJA चे किती सब्स्क्रायबर्स होतील असं ‘दहावी अ’च्या मुलांना विचारण्यात आलं. तेव्हा या मुलांनी अगदी प्रोत्साहन वाढवणारी उत्तरं दिली. ITSMAJJA ४ ते ५ मिलियनचा टप्पा पार करणार अशी आशा मुलांनी व्यक्त केली.
आणखी वाचा – “लोक अक्कल शिकवतील की…”, लेकाचा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरची पोस्ट, शिक्षिकेसाठी पत्र अन्…
ज्या माध्यमात आपण काम करतो तिथे जाऊन थेट काम कसं होतं हे पाहणं ‘दहावी अ’च्या कलाकारांना सरप्राइज करणारं होतं. आता आणखी एक सुखद धक्का या मुलांसाठी असणार आहे. ‘दहावी अ’ची मुलं १७ एप्रिलला वानखेडे येथे होणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यासाठी हजेरी लावणार आहेत. संयोगिता, सृष्टी, अथर्व, ओम, श्रेयस, सत्यजीत, रुद्र हे सगळेच कलाकार धमाल-मस्ती करताना दिसतील.