सुप्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे व भारतीय क्रिकेटपटू झहीर खान हे चर्चेत असणारं कपल. सागरिका व झहीरने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. लग्नाच्या सात वर्षांनंतर सागरिका व झहीर आई-बाबा झाले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे दोघांनीही मुलाबरोबरचा फोटो शेअर कर गुडन्यूज दिली. तसेच मुलगा झाला असल्याचं जाहिर केलं. इतकंच नव्हे तर मुलाचं नावंही त्यांनी ठेवलं आहे. त्याच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. (sagarika ghatge and zaheer khan baby boy)
सागरिका-जहीरच्या मुलाचा पहिला फोटो
सागरिका व झहीरने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत. “प्रेम, देवाच्या आशिर्वादाने आम्ही आमच्या गोड मुलाचं स्वागत करत आहोत” असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे. तसेच त्यांनी मुलाचं नावही जाहिर केलं. सागरिका व झहीरने ‘फतेहसिंह खान’ असं लेकाचं नाव ठेवलं आहे. हे नाव अगदी खास व युनिक आहे.
आणखी वाचा – ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार अरबाज खान?, दुसरी पत्नी लवकरच देणार गुडन्यूज, Video व्हायरल
लेकाचं नाव आहे फारच खास
सागरिका व झहीरने पोस्ट शेअर करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिडाक्षेत्रातील मंडळी तसेच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या गोड जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांकडूनही सागरिका व झहीरला आशिर्वाद दिले जात आहेत. काही महिन्यांपूर्वा सागरिका गरोदर असल्याचं समोर आलं होतं. मात्र दोघांनीही याबाबत बोलणं टाळलं होतं. आता थेट मुलगा झाला असल्याची बातमी देत त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला. सागरिका व झहीरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दिसणार आनंद काही औरच आहे.
२०१७मध्ये सागरिका व झहीरचं थाटामाटात लग्न झालं. त्यांची लव्हस्टोरीही अगदी फिल्मी आहे. मित्रमंडळींमुळे सागरिका व झहीर एकमेकांना ओळखू लागले. मैत्री वाढल्यानंतर जवळपास दीड ते दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ‘चक दे इंडिया’ चित्रपट सागरिकासाठी महत्त्वाचा ठरला. काही काळ ती कलाक्षेत्रापासून दूर असली तरी तिचा कपड्यांचा ब्रँड आहे. त्यासाठी ती अधिकाधिक मेहनत करते. आता सागरिका व झहीरच्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली आहे.