कलाकारांचे अफेअर, घटस्फोट, लग्न आणि त्याबाबत रंगणाऱ्या चर्चा बी-टाऊनला काही नव्या नाहीत. काहीजणं उघडपणे आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलतात. तर काही कलाकार आपल्या आयुष्याबाबत मौन पाळणंच पसंत करतात. ट्रोलिंग, चर्चा यांपासून दूर राहण्यासाठी शांत राहणंच हाच कलाकारांकडे एकमेव मार्ग असतो. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अरबाज खान. मलायक अरोराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर अरबाद खानने मौन पाळणंच पसंत केलं. किंबहुना मलायकानेही भाष्य करणं टाळलं. दोघंही आपापल्या आयुष्यात नव्या जोडीदारासह सुखाने आयुष्य जगत आहे. अरबाजने तर २०२३च्या डिसेंबरला शुरासह लग्न केलं. आता त्यांचं आयुष्य एक नवं वळण घेणार आहे. त्याचबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (arbaaz khan wife pregnant)
गेले दीड वर्ष अरबाज व शुरा सुखाने संसार करत आहेत. अरबाजच्या मुलासहही तिचं नातं घट्ट आहे. आता अरबाज व शुरा लवकरच गुडन्यूज देणार आहेत. शुरा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. अरबाज वयाच्या ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. याचबाबत आता चर्चा रंगत आहेत. अरबाज व शुराच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं. या व्हिडीओमध्ये दोघंही डॉक्टरकडे जाताना दिसत आहेत.
आणखी वाचा – CID मधील नवा एसीपी प्रेक्षकांना पटेना, सीन पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “सर्वात वाईट अभिनय…”
शुरा ज्या दवाखान्यात गेली तेथील माहिती समोर आली आहे. स्त्री आजारांबाबत तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांकडे अरबाज तिला घेऊन गेला होता. दरम्यान शुराची तो काळजी घेताना दिसला. शुरा खरंच गरोदर आहे का? यावर अजूनही शिक्का मोर्तब झालेला नाही. ती नेहमीच्या आरोग्य तपासणीसाठी गेली असावी असाही अंदाज वर्तवला जात आहे. मध्यंतरी ईद पार्टीमध्ये दोघंही आले होते. यावेळी अरबाज व शुराने फोटो काढण्यास नकार दिला होता.
मलायकासह अधिकृतरित्या घटस्फोट झाल्यानंतर अरबाजने दुसरं लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. दीड वर्षांपूर्वी शुराबरोबर लग्न करत त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लग्नानंतर मात्र अरबाज त्याच्या मुलाची जबाबदारीही घेतो. मलायका व अरबाज लेकासाठी एकत्र येतात. शिवाय शुराही बऱ्याचदा अरबाजच्या मुलासह एकत्र दिसते. आता खरंच शुरा गरोदर आहे का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.