मेहनत, जिद्द व चिकाटी असलेल्या माणसाला कुठेच मरण नाही असं आपल्यापेक्षा थोरली मंडळी बोलताना कानावर पडतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर याचा प्रत्यय येतो. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोरियोग्राफर-दिग्दर्शक फराह खानचा कुक दिलीप. दिलीप गेली कित्येक वर्ष फराहसाठी काम करत आहे. तिच्या घरी जेवण बनवतो. आता तर त्याचं नशिबंच खुललं आहे. नशिबापेक्षा त्याला सध्या त्याच्या मेहनतीचं फळ मिळत आहे. फराह दिलीपबरोबर विविध व्लॉग बनवते. जेवण बनवतानाच्या गंमती जमती सांगते. त्याची मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. आता फराहबरोबर दिलीपही प्रसिद्ध झाला आहे. शिवाय आर्थिकदृष्ट्याही तो भक्कम आहे. त्याच्याकडे असणाऱ्या संपत्तीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (farah khan life)
कुक झाला सेलिब्रिटी
फराह विविध सेलिब्रिटींनी घरी बोलावते. दिलीपला त्यांच्या आवडीचं जेवण बनवायला सांगते. मात्र हे सगळं करत असताना ती दिलीपसह व्हिडीओ शूट करते. सेलिब्रिटीही स्वयंपाकघरात फराह-दिलीपबरोबर धमाल-मस्ती करतात. तिच्या या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्ह्युज असतात. आता पुढील व्हिडीओ दिलीप शाहरुख खानसह शूट करणार आहे. ही त्याच्यासाठी मोठी आनंदाची बातमीच आहे. विशेष म्हणजे शाहरुखसह तो जाहिरात शूट करणार आहे. फराहने व्हिडीओद्वारे दिलीपशी संवाद साधताना ही माहिती दिली.
आणखी वाचा – ड्रेस-साडी विकते, मुंबई सोडली, लेकीला घेऊन…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची वाईट अवस्था, घटस्फोटानंतरची परिस्थिती…
आलिशान कारचा मालक
व्हिडीओमध्ये दिलीप म्हणतो, “फराह मॅम मला आता गाडी खरेदी करुन द्या. सध्या मी बीएमडब्ल्युमधून फिरतो. त्यापेक्षाही मोठी गाडी खरेदी करेन”. दिलीपचं हे म्हणणं ऐकून फराहला धक्काच बसतो. पुन्हा दिलीप म्हणतो, “आपल्याकडे BMW चं कोणतं मॉडेल आहे? त्यातूनच मी फिरतो. तुम्ही जेव्हा आराम करत असता त्यातूनच मी जातो”. फराह बोलते, “मग तुला माझी आहे तिच गाडी खरेदी करायची आहे का?”. त्यावर दिलीप मला नवीन गाडी हवी आहे असं पटकन उत्तर देतो.
मोठा बंगला, सहा बेडरुम आणि…
फराह व दिलीपचा हा मजेशीर संवाद खरंच ऐकण्यासारखा व पाहण्यासारखा आहे. करण वाही व करण पटेलसह शूट झालेल्या व्लॉगमध्ये फराह व दिलीप मजेशीर संवाद साधत असतात. तेव्हा करण पटेल बंगल्यामध्ये राहत असल्याचं करण वाही सांगतो. यावरुनच फराह मोठा खुलासा करते. बिहारमध्ये दिलीपचा तीन मजली बंगला असल्याचं ती सांगते. त्याच्या या बंगल्याला सहा बेडरुम आहेत. तिथे दिलीपची पत्नी, दोन मुलं व आई-वडील राहतात. शिवाय त्याची बरीच जागा-जमीन आहे. दिलीपची ही प्रगती खरंच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.