प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कलाकारांच्या चेहऱ्यांबाबत प्रत्येकाला विलक्षण कुतूहल असतं. रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं, आपल्याला कलेला दाद मिळावी म्हणून कलाकार दिवसरात्र मेहनत करतात. खरंतर चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या या माणसांचा स्ट्रगल कधीही न संपणारा आहे. दिवसागणिक मेहनत वाढत असते आणि प्रत्येक प्रसंगांना हिंमतीने सामोरं जावं लागतं. कित्येकदा तर वाईट अनुभवांचाही सामना करावा लागतो. कित्येकदा तर सेटवरच कळत नकळतपणे सहकलाकारच वेगळी वागणूक देतात. मग अशावेळी संयमाने आपलं काम करत राहावं लागतं. अशाच काही प्रसंगांचा सामना करणारी अभिनेत्री म्हणजे शितल क्षीरसागर. करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये शितलला काही अनुभव आले. याचबाबत आता तिने खुलासा केला आहे. (Marathi Actress Sheetal Kshirsagar)
शितलने मराठी मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. खलनायिका म्हणूनही ती नावारुपाला आली. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतही ती आता उत्तम काम करते. ITSMAJJA च्या ‘मज्जाचा अड्डा’ कार्यक्रमात शितलने अगदी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यावेळी तिने अनुभवी कलाकारांबरोबर काम करण्याविषयी सांगितलं.
आणखी वाचा – महिला चाहतीवर रागावल्या जया बच्चन, हातही झिडकारला अन्…; नेटकऱ्यांना खटकलं, म्हणाले, “हिला सहन…”
अनुभवी कलाकारांकडून त्रास
“एखाद्या कलाकाराच्या वाट्याला आलेली भूमिका मी उत्तम करु शकत होते. असं कधी वाटलं का?” असा प्रश्न शितल यांना विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, “काही अनुभवी कलाकार माझ्याशी कळत नकळत ज्या पद्धतीने वागत होते ज्याने मला त्रास होत होता. मला भूमिका मिळवण्याच्या मार्गात ते अडथळा बनून उभे राहत होते. मला त्यांनी खाली खेचण्याचाही प्रयत्न केला. त्यादरम्यान प्रत्येकवेळी मी स्वतःला हेच वचन दिलं होतं की, काही वर्षांनी मीही अनुभवी कलाकार होईन. पण त्यावेळी माझ्याशी जसे अनुभवी कलाकार वागले तसं मी करणार नाही. जर तुला पाठिंबा देता असेल नसेल तर गप्प बसशील. कोणाला त्रास देणार नाही आणि पाय खेचणार नाही. हा निर्णय मी खूप जाणीवपूर्वक घेतला आहे”.
आणखी वाचा – २१व्या वर्षी लग्न, २५शीमध्ये दोन मुलं कारण…; स्वप्नील राजशेखर यांचं खासगी आयुष्याबाबत भाष्य
फुकटचा सल्ला देणे नाही
“आता माझ्या बरोबर एकापेक्षा एक टॅलेंटेड सहकलाकार आहेत. अतिशय उत्तम काम करतात. मीही माझी प्रतिमा उत्तम राखून ठेवल्यामुळे त्यांना जर काही सल्ला दिला तर ते माझं ऐकतात. त्यांनी ऐकलंही नाही तरी मला वाईट वाटत नाही. त्यांचा मला सगळं पटतं असंही नाही, काही गोष्टी खटकतात. पण अनुभवाने मला हेही कळालं आहे की, विचारल्याशिवाय तुम्ही सल्ला देऊ नये”. शितल यांचा संयम आणि कामाप्रती निष्ठा खरंच कौतुकास्पद आहे.