रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : वडिलांचा ९३वा वाढदिवस, खास सेलिब्रेशन अन्…; आदेश बांदेकर यांच्या वडिलांचे प्रेम पाहून नेटकरीही भारावले

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 20, 2025 | 1:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh Bandekar Father Birthday

वडिलांचा ९३वा वाढदिवस, खास सेलिब्रेशन अन्…; आदेश बांदेकर यांच्या वडिलांचे प्रेम पाहून नेटकरीही भारावले

Aadesh Bandekar Father Birthday : ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून “दार उघड बये दार उघड” असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले अभिनेते, निवेदक म्हणजे आदेश बांदेकर. आदेश बांदेकर हे मनोरंजन क्षेत्रासह राजकारणातही तितकेच सक्रिय आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. सध्या या कार्यक्रमाने ब्रेक घेतला आहे. असं असलं तरी आदेश बांदेकर त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. आदेश बांदेकर त्यांच्या सोशल मीडियावरुन नेहमीच काही ना काही शेअर करत संपर्कात राहतात. सोशल मीडियावर त्यांचा बऱ्यापैकी वावर आहे.

सोशल मीडियावर ते नेहमीच त्यांच्या कुटुंबाबरोबरचे अनेक व्हिडीओ, पोस्ट शेअर करतात. आदेश यांच्या पत्नी सुचित्रा आणि मुलगा सोहम दोघेही सिनेविश्वात सक्रिय आहेत. आजवर आदेश यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर घालवलेल्या वेळेबाबत नेहमीच पोस्ट शेअर केल्या आहेत. यानंतर आता आदेश यांनी शेअर केलेली आणखी एक पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. ही पोस्ट आदेश यांनी त्यांच्या वडिलांसाठी केली आहे. आदेश यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – ‘छावा’ की ‘गदर’?, बॉक्स ऑफिसवर सहाव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ठरला ‘हा’ चित्रपट, ‘जवान’, ‘पठाण’लाही टाकलं मागं

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

आदेश यांनी त्यांच्या वडिलांचा खास व्हिडीओ शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये आदेश यांचे ९३ वर्षीय त्यांचे वडिल वॉक करत आहेत. चंद्रकांत यशवंत बांदेकर. माझे पप्पा. २० फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस. ९३ व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं आहे. आध्यात्मिक संस्कारात वाढलेले. खडतर आयुष्य साकारात्मक दृष्टिकोनातून आनंदमय कसं करायचं हे शिकवणारे आमच्या कुटुंबाचं गुरुकुल. वाढदिवसाच्या शुभेच्छांसह सुदृढ दिर्घायुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना”, असं कॅप्शन देत त्यांनी हा वडिलांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “लक्षात ठेवा, मी समय आहे…”, वादानंतर कॅनडामध्ये समय रैनाचा शो, रणवीर अलाहाबादियाचाही उल्लेख, म्हणाला, “वेळ वाईट आहे पण…”

आदेश बांदेकरांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सीमा घोगले, सुकन्या मोने, सोहम बांदेकर या कलाकार मंडळींनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Aadesh BandekarAadesh Bandekar Father birthdaymarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sachet And Parampara Tandon Announced Their Baby Name 

सचेत-परंपराने ठेवलं लेकाचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.