शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘हेरा फेरी ३’मध्ये तब्बूही दिसणार? अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाली, “माझ्याशिवाय…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2025 | 2:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tabbu will be in Hera Pheri 3 movie

'हेरा फेरी ३' या चित्रपटात तब्बूही असणार? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकूटाच्या अफलातून कॉमेडीने सजलेला बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’. या चित्रपटाचे ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे दोनही भाग चांगलेच गाजले. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ घवघवीत यशानंतर आता’फिर हेरा फेरी’चा तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही बातमी दिली. ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागाच्या घोषणेमुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. (Tabbu will be in Hera Pheri 3 movie)

‘हेरा फेरी’च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. तर ‘फिर हेरा फेरी’चं दिग्दर्शन नीरज वोरा यांनी केलं होतं. ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन फरहाद सामजी करणार हे जवळपास निश्चित होतं. परंतु चाहत्यांच्या मनातली गोष्ट घडली असून ‘हेरा फेरी ३’च्या दिग्दर्शनाची धुरा प्रियदर्शन सांभाळणार आहेत. प्रियदर्शनने ३० जानेवारी रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा केला. अक्षय कुमारने प्रियदर्शनला शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आणि म्हटले की, सेटवर तुझा वाढदिवस तुझ्यासोबत साजरा करण्याचा चांगला मार्ग आणखी कोणता असू शकतो.

आणखी वाचा – छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाज देऊन पळाले म्हणणाऱ्यावर भडकला हेमंत ढोमे, म्हणाला, ” रोज उठून नवा इतिहास सांगणारे…”

यावर उत्तर म्हणून प्रियदर्शनने एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘मी रिटर्न गिफ्ट्स देखील देतो आणि मला ‘हेरा फेरी ३’ बनवायचा आहे. तुम्ही तयार आहात का? त्याने पोस्टमध्ये अक्षय, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना टॅग केले.’ आणि तिघांनीही या पोस्टला प्रतिसाद दिला. यानंतर सुमारे तीन-चार दिवसांनी, आता सोमवारी, तब्बूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अक्षय कुमारची पोस्ट शेअर केली आहे. याबरोबरच अभिनेत्रीने लिहिले की, “माझ्याशिवाय स्टारकास्ट पूर्ण होणार नाही”.

आणखी वाचा – आजारपणानंतर गुरुचरण सिंह पुन्हा ‘तारक मेहता…’मध्ये परतणार, निर्मात्यांकडे काम मागत म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”

दरम्यान, प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हेरा फेरी’ (२०००) चित्रपटात तब्बू दिसली आहे. या लोकप्रिय चित्रपटाचा दुसरा भाग २००६ मध्ये आला. त्याचे दिग्दर्शन नीरज वोरा यांनी केले होते. यामध्ये तब्बू दिसली नाही. दुसऱ्या भागात बिपाशा बसू, सुनील शेट्टी, अक्षय आणि परेश रावल यांच्याव्यतिरिक्त, राजपाल यादव आणि रिमी सेन दिसले. तब्बूच्या या पोस्टने ती सुद्धा आता ‘हेरा फेरी ३’चा भाग असण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. ‘हेरा फेरी ३’मध्ये तब्बू असल्याच्या शक्यतेने अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tags: Hera Pheri 3Tabbu Hera PheriTabbu will be in Hera Pheri 3 movie
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
actress Pushpalata passed away

ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पलता यांचे निधन, वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कलाकारही हळहळले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.