शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जपनाम सुरु करा, बाबा निराला आले! ‘आश्रम ३’ प्रेक्षकांच्या भेटीला, काय असेल कथा?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 31, 2025 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bobby Deol's Aashram series season 3 part 2 teaser out

बॉबी देओलच्या आश्रम सीरिजच्या तिसऱ्या भागाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

ओटीटी विश्वातील काही लोकप्रिय सीरिजमधील एक सीरिज म्हणजे ‘आश्रम’. या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन्स आले आहेत. तेव्हापासून अनेकजण या सीरिजच्या तिसऱ्या भागाची वाट बघत होते आणि अशातच आज तिसऱ्या भागाची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘आश्रम ३’चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत बॉबी देओल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझरमध्ये बाबा निराला सडपातळ आणि भयानक भूमिकेत दिसत आहेत. जो महिलांना स्वतःच्या वासनेचा शिकार बनवतो. पण अखेर त्याचं सत्य सर्वांसमोर येतं. नवीन टीझरमध्ये बाबा निरालाची नजर एका नवीन महिलेवर आहे, परंतु शेवटी ती शिकार त्यांच्यासाठी खूप कठीण असू शकते. (Aashram series season 3 part 2)

निराला बाबाचं सत्य समोर येण्यासाठी रचलेला कट आणि गोळीबार… यामुळे कथेला वेगळं वळण मिळणार आहे. टीझरमध्ये बाबा निरालाचे दुष्ट रूप दिसत आहे, भरपूर गोळ्या झाडल्या जात आहेत आणि कटाचे जाळेही विणलेले दिसत आहे, एकूणच टीझर जबरदस्त आहे आणि तो पाहिल्यानंतर चाहते सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.  प्रकाश राज यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या मालिकेचा नवा भाग न्याय आणि बदला या कथेवर आधारित असेल. एमएक्स प्लेअरने या टीझरमधील कथा आणि पात्रांबद्दल सूचना दिल्या आहेत. 

View this post on Instagram

A post shared by Amazon MX Player (@mxplayer)

आणखी वाचा – खोटा फोटो लावून कार्यक्रमाचे निमंत्रण देणाऱ्यांवर भडकली प्राजक्ता माळी, पोस्ट शेअर करत म्हणाली, “चुकीची बातमी…”

‘आश्रम’च्या मागच्या सीझनमध्ये आपण पाहिले की बाबा आपल्या शक्तीचा वापर करून न्यायालयीन केस पूर्णपणे उलथवून टाकतात. पम्मीवर गुन्हा दाखल करून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पम्मी तुरुंगात असताना रुग्णालयात दाखल असलेल्या तिच्या आईचे निधन झाले. पम्मी तुरुंगातून सुटून बाबा निराला यांच्या आश्रमात पोहोचते. इथे तिचे स्वागत झाले पण आता पम्मीने बाबा निरालाचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे. 

आणखी वाचा – वाढदिवशी सायली संजीव वडिलांच्या आठवणीत भावुक, फोटो पोस्ट करत म्हणाली, “खूप आठवण येतेय आणि…”

‘आश्रम’चा पहिला सीझन २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. त्याचा दुसरा सीझन ‘आश्रम चॅप्टर २: द डार्क साइड’ देखील नोव्हेंबर २०२० मध्ये रिलीज झाला. यानंतर २०२२ मध्ये ‘आश्रम’च्या तिसऱ्या सीझनचा पहिला भाग रिलीज झाला, त्यानंतर चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते.

Tags: aashram bobby deol seriesAashram series season 3 part 2aashram web series
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Rakhi Sawant Marriage

राखी सावंतचं लग्न होण्याआधीच मोडलं, होणाऱ्या नवऱ्याचा नकार पण वचन देत म्हणाला, "पाकिस्तानची सून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.