अनेकदा कलाकारांच्या नावाचा, लोकप्रियतेचा आणि प्रसिध्दीचा वापर करुन काही मंडळी चुकीची माहिती पसरवत असतात. असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल. जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र आता तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटांमधूनही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तिने ‘पांडू’, ‘पावनखिंड’ सारख्या चित्रपटातून आपापल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना दाखवल्या. अभिनयात यश मिळवत असताना तिने स्वतःचा ज्वेलरी ब्रॅण्डदेखील सुरू केला. प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. (Prajakta Mali angry on event organizers)
अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य याशिवाय निर्मिती… अशा अनेक भूमिका पार पाडणारी प्राजक्ता सोशल मीडियावरही चर्चेत राहत असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोटमधून तिने कलाकारांच्या नावाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर आगपाखड केली आहे. काराडमधील एका कार्यक्रमात प्राजक्ता माळीसह मराठी मनोरंजन विश्वातील अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, हृता दुर्गुळे यांच्यासह सचिन तेंडुलकर व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना निमंत्रित केल्याचे म्हटलं आहे.पण प्राजक्ताने मात्र हे खोटं असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा – अधिपती-अक्षरा यांच्यामध्ये गैरसमज वाढला, नात्यामध्ये त्या व्यक्तीमुळे संशय, भुवनेश्वरीला आनंद
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या कार्यक्रमाचे पोस्टर शेअर करत त्याबरोबर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाहीये. या कार्यक्रमाबद्दल मला किंवा माझ्या टीमला कोणताही संपर्क साधला गेला नाही. ही चुकीची माहिती आहे. याबद्दल संबंधितांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारे कलाकारांचे फोटो टाकून प्रेक्षकांना फसवू नये ही विनंती”.
आणखी वाचा – 31 January Horoscope : आर्थिक अडचणीमुळे मन अस्वस्थ राहील, शुक्रवारचा दिवस कुणासाठी कसा असेल? जाणून घ्या…
दरम्यान, एक सोज्वळ, सुंदर अभिनेत्री, उद्योजिका, निर्माती, सूत्रसंचालक, कवयित्री अशा अनेक भूमिका लीलया पार पाडणारी प्राजक्ता कायमच चर्चेत राहत असते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहतावर्ग तयार केलेला आहे. काही दिवसांपूर्वी तिचा फुलवंती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची प्राजक्ताने निर्मिती केली असून यात ती मुख्य भूमिकेतही दिसली. या चित्रपटाच्या माध्यमातूनच प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले.