रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“संन्यासानंतरही अभिनय करणार का?”, ममता कुलकर्णीने दिलं उत्तर, म्हणाली, “चित्रपटसृष्टीत परतणे माझ्यासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 27, 2025 | 10:06 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mamta Kulkarni replied on will you act after sannyas

“संन्यासानंतरही अभिनय करणार का?”, ममता कुलकर्णीने दिलं थेट उत्तर

‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा’ है आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ९०च्या दशकातली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. २००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘छुपा रुस्तम’ हा तिचा शेवटचा हिट चित्रपट होता. यानंतर तिने २००२ मध्ये आलेल्या ‘कभी हम कभी तुम’ या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्राला कायमचा अलविदा केला आणि केनियाला गेली. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी अभिनेत्री पुन्हा भारतात परतली. अशातच तिने नुकताच संन्यासही घेतला. २४ जानेवारी रोजी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात संपूर्ण विधीवत अभिषेकानंतर तिने आपल्या संन्यासाची घोषणा केली आणि नावही बदलले. (Mamta Kulkarni replied on will you act after sannyas)

ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. २४ जानेवारी रोजी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात संपूर्ण विधीवत अभिषेकानंतर तिने ही पदवी धारण केली. अभिनेत्री आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. यामुळे भविष्यात ती कधी अभिनय करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने “चित्रपटसृष्टीत परतणे माझ्यासाठी अकल्पनीय आहे. माझे संपूर्ण लक्ष अध्यात्मावर आहे”. असं म्हटलं. ‘इंडिया टुडे’शी बोलताना ममता कुलकर्णी म्हणाली की, “मी पुन्हा चित्रपटात काम करण्याचा विचारही करू शकत नाही. आता हे माझ्यासाठी पूर्णपणे अशक्य आहे”.

View this post on Instagram

A post shared by Mamta Kulkarni 🔵 (@mamtakulkarniofficial____)

आणखी वाचा – सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिस पश्चिम बंगालमध्ये दाखल, हल्लेखोराला मदत करणाऱ्याचा घेणार शोध

‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत ममताने असं सांगितलं की, “हो, मी नुकताच बॉलिवूडला निरोप दिला आहे.’ तरीही, मला कोणत्याही धार्मिक परिषदेत उपस्थित राहण्याचे किंवा कोणतेही पात्र साकारण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. मी कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ शकते”. तसंच यापुढे तिने स्वत:च्या आध्यात्मिक प्रवासाचे वर्णन अत्यंत आनंददायी असल्याचे सांगितले आणि किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर होण्याच्या तिच्या सन्मानाची तुलना २३ वर्षांच्या भक्तीनंतर ऑलिम्पिक पदक जिंकण्याशी केली.

आणखी वाचा – “हा एकट्या अशोकचा सन्मान नाही”, अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर होताच पत्नी निवेदिता सराफ झाल्या व्यक्त, म्हणाल्या, “त्यांना कामापुढे…”

दरम्यान, प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यादरम्यान ममता कुलकर्णीने संगम येथे पवित्र पिंड दान केले आणि तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद देण्यात आले. तेव्हापासून तिने ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ हे नाव धारण केले आहे आणि एक आध्यात्मिक नेता म्हणून तिची नवीन भूमिका स्वीकारली आहे. 

Tags: Mamta Kulkarni replied impossible for me to return to the film industryMamta Kulkarni replied on will you act after sannyasMamta Kulkarni sannyas
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dipika Kakkar  liver cancer know its Symptoms 
Lifestyle

चुकीच्या पद्धतीने खाद्यपदार्थ शिजवणं दीपिका कक्करला पडलं महागात?, लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शिकार आणि…

जून 8, 2025 | 10:00 am
Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Next Post
Abhijeet Shwetchandra  Shares Goodnews

कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, सिनेमॅटिक व्हिडीओद्वारे दिली गुडन्यूज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.