शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हा एकट्या अशोकचा सन्मान नाही”, अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर होताच पत्नी निवेदिता सराफ झाल्या व्यक्त, म्हणाल्या, “त्यांना कामापुढे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 26, 2025 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nivedita  Saraf

अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर होताच पत्नी निवेदिता सराफ झाल्या व्यक्त, म्हणाल्या, "त्यांना कामापुढे…"

Nivedita  Saraf : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यादरम्यान मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ही आनंदाची बाब ऐकून कलाविश्वात सर्वत्र आनंद पसरला आहे. इतकंच नाही तर अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तेव्हा व्यक्त होताना निवेदिता यांनी पद्मश्री पुरस्कार मिळण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्यांची ही इच्छाही पूर्ण झाली आहे.

पद्मश्री जाहीर झाल्यावर अशोक सराफ यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना असं म्हटलं की, “मला खरंच खूप आनंद झाला आहे. मी खूप आभारी आहे. हा एकट्या अशोकचा सन्मान नाही आहे, हा महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाचा सन्मान आहे. कारण, त्यांनी नेहमी अशोकवर प्रेम केलं. त्यांच्या अभिनयावर प्रेम केलं. त्यांची जी अविरत मेहनत आहे. इतक्या वर्षांनी त्याचं सार्थक झालं. अशोकने केवळ एकाग्रतेने अभिनय एके अभिनयच केला. त्या सगळ्याची ही पोचपावती आहे. मी प्रेक्षकांची खूप ऋणी आहे, महाराष्ट्राच्या जनतेची आणि केंद्र सरकारची कारण ही आम्हा कुटुंबीयांसाठी खूपच आनंदाची बाब आहे”.

आणखी वाचा – साधी भोळी माझी आई! आईच्या वाढदिवसानिमित्त रुपाली भोसलेची भावुक पोस्ट, म्हणाली, “खूप कष्ट सोसले पण…”

पुढे त्या म्हणाल्या की, “अशोकने त्यांच्या सगळ्या प्रेक्षकांना नेहमी देवासमान मानलंय. त्यांना कामापुढे कधीच काही दिसलं नाही, कधी पैसे कमावणं हे देखील उद्दिष्ट नव्हतं. मी जगात काहीही करु शकतो पण, माझ्या प्रेक्षकांना मी कधीच फसवू शकत नाही, असं ते नेहमी म्हणायचे. त्यामुळे एवढी वर्षे त्यांनी केवळ प्रामाणिकपणे आपलं काम केलं. भूमिका छोटी असो, मोठी असो त्यांनी नेहमी प्रामाणिकपणाने सर्व केलं. महाराष्ट्र भूषण आमच्यासाठी विशेष आहेच आणि आता त्यांना पद्मश्री मिळाला आहे, म्हणून मी खरंच खूप आनंदी आहे”.

आणखी वाचा – मध्या, आभ्या, विक्या, किरण्या शाळेत पुन्हा परतले, पण रेश्मा व केवडामध्ये गैरसमज, काय असेल नेमकं कारण?

निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या, “आम्हाला हा सन्मान महाराष्ट्रातील लोकांना समर्पित करायचा आहे आणि अर्थातच त्यांच्या कारकिर्दीला आकार देण्यात भूमिका बजावणाऱ्या सर्व दिग्दर्शक, लेखक आणि सह-कलाकारांना हा पुरस्कार आम्ही समर्पित करतो”.

Tags: ashok saraf padmashri awardmarathi actorNivedita  Saraf
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
MNS Leader Amey Khopkar

"सिनेमा जगवायचा असेल तर…", चित्रपटगृहांत स्क्रीन न मिळण्यावरुन मनसे नेत्याची पोस्ट, मराठी निर्मात्यांना म्हणाले, "लवकरच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.