Rupali Bhosale Emotional Post : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसली. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसली. या मालिकेतील प्रत्येक कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. असं असलं तरी मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेतून खलनायकी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री रुपाली भोसले हिने तिच्या ग्रे शेडने तर साऱ्यांना भुरळ घातली.
रुपालीची संजना ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या मालिकेमुळे रुपालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर रूपाली नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आईसाठी खास भावुक पोस्ट लिहिली आहे.
रुपालीने आईचा फोटो पोस्ट करत कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “‘साधी भोळी माझी आई, सुखाची गं तु सावली’, ‘जीव ओवाळून लावी, माझी गं तु लाडू बाई’. स्वत:ला विसरुन इतरांसाठी सर्व काही करणारी, तू प्रेम दिलंस, सगळ्यांना तू नेहमीच जपलंस, खूप कष्ट सोसले पण आता येणारा प्रत्येक क्षण, तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा आणि यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल. तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू, असेच काय असू दे. माझ्या आयुष्यातील यशाच्या शिड्या जिच्या जीवावर मी चढल्या अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मातोश्री”.
काही दिवसांपूर्वी रुपालीने तिचं नवं आणि हक्काचं घर मुंबईत घेतलं. इतकंच नव्हे तर तिचं आलिशान गाडी घेण्याचंही स्वप्न पूर्ण झालं. रुपालीच्या नव्या घराचा, नव्या गाडीचा व्हिडीओ बराच चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला. आता रुपाली ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर कोणत्या नव्या मालिकेत दिसणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.