Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अनुष्काचा खरा चेहरा पारूने सर्वांसमोर आणलेला असतो. पारू अनुष्काने तिची छेड काढणाऱ्या मुलाला पैसे देऊन सोडवल्याचं सत्य अहिल्यादेवींसमोर सांगते. हे ऐकून इतर घरातील सदस्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर आदित्य अनुष्काला जाब विचारतो. तेव्हा अनुष्का, हो मी हे सगळं केलं असल्याचं सत्य सांगते. मात्र, अहिल्यादेवी अनुष्काला सगळं काही सत्य सांगण्यास सांगतात. तेव्हा अनुष्का तयार नसते. अहिल्यादेवी स्वतः सांगतात की, त्या मुलांना सोडवण्यासाठी मीच अनुष्काला पैसे द्यायला सांगितल होतं. हे ऐकल्यावर सगळे चकित होतात.
त्यानंतर अहिल्यादेवी असं करण्यामागील कारण सांगतात. एकीकडे अनुष्काने पारूला तिचा पाठलाग करताना पाहिलेलं असतं. त्यामुळे संधी साधून अनुष्का अहिल्याला आदित्यला पोलीस पकडणार असल्याच खोटं कारण देत पैसे दिले असल्याचे सांगते. तर हेच अहिल्यादेवी सगळ्यांसमोर सांगतात आणि पारूला खडेबोल सुनावतात. “आमच्या प्रत्येक कामात नाक खुपसायची काहीच गरज नाही आहे. आणि तू अनुष्काशी आदरांनेच बोललं पाहिजे, असं म्हणतात”. अपमान केल्यानंतर पारू तिथून निघून जाते. तर ही गोष्ट मारुतीला कळते तेव्हा मारुती पारुला काठीने बेदम मारतो.
आणखी वाचा – ‘कभी खुशी कभी गम’मधील काजोलचा लेक आता दिसतो असा, ओळखणंही झालं कठीण, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्
तेव्हा प्रीतम व प्रिया येऊन मारुतीला थांबवतात. तर पारू स्वतःच्या चुकीची शिक्षा म्हणून हे सगळं काही सहन करते. त्यानंतर पारू किर्लोस्कर बंगल्यात येते. मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, आदित्य व अनुष्काच्या लग्नानंतरच्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा असते. अशातच मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, असं पाहायला मिळतंय की, प्रेक्षकांना हे नवं फोटोशूट पसंत नसतं. त्यामुळे कंपनीचं खूप मोठं नुकसानही झालेलं असतं.
श्रीकांत याबाबत अहिल्याला सांगतो, तेव्हा अहिल्याला खूप मोठा धक्का बसतो. श्रीकांत कंपनीचे सर्व शेअर्स ढासळले असल्याचंही अहिल्याला सांगतो. आणि कदाचित आपली नवी मॉडेल, नवी ब्रँड अँबेसेडर प्रेक्षकांना आवडली नसल्याचं तो सांगतो. तेव्हा आदित्य तिथे येतो आणि अहिल्याला ‘मला तुझ्याशी बोलायचं आहे असं सांगतो’. यावर अहिल्या आदित्यबरोबर बोलायला नकार देते. आता अहिल्या नेमका काय निर्णय घेणार, आदित्य त्यावर काय बोलणार, तो पारुबाबत अहिल्याशी बोलेल का हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.