शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्राजक्ता माळीची ज्योतीर्लिंग यात्रेला पुन्हा सुरुवात, शेअर केले मंदिरातील खास फोटो, म्हणाली, “पुन्हा सुरु…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 8, 2025 | 6:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Actress Prajakta Mali visit to Shri Ghrishneshwar Jyotirlinga Temple in Chhatrapati Sambhajinagar and she shared photos of social media

प्राजक्ता माळीने श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला दिली भेट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी ही त्यांच्या कामाव्यतिरिक्त आध्यात्मिक कार्यातही तितकेच सक्रीय असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता अलीकडेच तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रचंड व्यग्र होती. प्रोडक्शन, निर्मिती, प्रमोशन आणि मुलाखती या सगळ्यात एक निर्माती व अभिनेत्री म्हणून म्हणून तिची चांगलीच धावपळ सुरु होती. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्रीने श्री सोमनाथ आणि श्री नागेश्वर या गुजरातमधील ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले. २०२३ मध्ये तिने एक संकल्प केला होता की, ती १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा करणार आहे. ही यात्रा एकाच प्रवासात करता येणं तिच्यासाठी शक्य नसल्याने अभिनेत्री टप्प्याटप्प्याने ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेते आहे. Prajakta Mali visit to Shri Ghrishneshwar Jyotirlinga Temple)

अभिनय, निर्मिती व व्यवसाय अशा तीनही क्षेत्रात सक्रीय असणारी प्राजक्ता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करणारी प्राजक्ता तिच्या देवदर्शनाचे काही खास क्षणही सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतीच तिने छत्रपती संभाजीनगरमधील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या मंदिराला भेट दिली आणि याचे काही खास क्षण तिने शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’मधून अचानक एक्झिट घेतल्यानंतर तेजश्री प्रधानची निराशाजनक पोस्ट, म्हणाली, “तुम्ही योग्य किंमत व आदर…”

प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती शिवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती शिवाची आरती करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पिंडीवर बेल वाहताना दिसत आहे. तर पुढच्या फोटोमध्ये ती देवासमोर नतमस्तक झाली आहे. तर यापुढे तिने मंदिराबाहेरील फोटोही शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. अनेकांनी या फोटोला लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 18 च्या ग्रँड फिनाले पूर्वीच विजेत्याचे नाव समोर, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?

दरम्यान,  २३ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्रातल्या परळी वैजनाथपासून या यात्रेची सुरुवात केली होती. त्यावेळीच अभिनेत्रीने म्हटले होते की, व्यग्र वेळापत्रामुळे तिला ही यात्रा एकसंथपणे करता येणं शक्य नसल्याने ती जमेल तशी याची पूर्णता करणार आहे. त्यानंतर  ५ ऑगस्ट २०२४ रोजी या संकल्पातील दुसरा टप्पा पार केला होता, तिने नाशिकमधील त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले आणि आता तिने छत्रपती संभाजीनगर मधील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलं.  

Tags: marathi actress prajakta mali newsprajakta maliPrajakta Mali visit to Shri Ghrishneshwar Jyotirlinga Temple
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
nouran aly on vivian dsena first wife

विवियन डिसेनाच्या पत्नीचं पहिल्या बायकोबद्दलचं भाष्य चर्चेत, म्हणाली, "तुमचा घटस्फोट झाला असेल तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.