देशातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक असलेल्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा नुकतीच झाली आहे. ज्यामध्ये अनेक मराठी, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांनी महत्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. या पुरस्कारांमध्ये ‘गंगुबाई काठियाववाडी’, ‘सरदार उधम’ व ‘RRR’ या चित्रपटांचा सर्वाधिक बोलबाला राहिला आहे. (69th National Film Awards 2023)
नवी दिल्लीत आज या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट व क्रिती सेनन यांना विभागून देण्यात आला आहे. तर अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सरदार उधमला हिंदी फिचर फिल्मचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेत्री पल्लवी जोशी हिला ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
नेहमीप्रमाणे यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपली छाप पाडली आहे. ‘गोदावरी’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार सलील कुलकर्णी यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने पटकावला आहे.
हे देखील वाचा – 69th National Film Awards : ‘सरदार उधम’ला राष्ट्रीय पुरस्कार, आलिया व क्रिती ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मराठी चित्रपटांनीही मारली बाजी
दरम्यान, ‘गोदावरी’ चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल अभिनेता सुबोध भावेने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. “राष्ट्रीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये ‘गोदावरी’ चित्रपटाचा सन्मान करण्यात आला त्याबाबत निखिल महाजन तुझं अभिनंदन”, असं लिहीत सुबोधने दिग्दर्शक निखिल महाजनचे अभिनंदन केले आहे. (marathi films in 69th National Film Awards 2023)
हे देखील वाचा – दोन दिवसांनी रवींद्र महाजनींच्या मृ्त्यूची बातमी समोर का आली?, गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा, म्हणाला, “कुटुंबियांशी त्यांनी संपर्क न ठेवता…”
निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तर ‘एकदा काय झालं’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटात सुमित राघवन, उर्मिला कोठारे, मोहन आगाशे आदी प्रमुख भूमिकेत आहे.