सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन दिवसांनी रवींद्र महाजनींच्या मृ्त्यूची बातमी समोर का आली?, गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा, म्हणाला, “कुटुंबियांशी त्यांनी संपर्क न ठेवता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 24, 2023 | 6:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani

दोन दिवसांनी रवींद्र महाजनींच्या मृ्त्यूची बातमी समोर का आली?, गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा, म्हणाला, "कुटुंबियांशी त्यांनी संपर्क न ठेवता..."

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी याच्या अचानक आलेल्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीलाच धक्का बसला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. पुणे जिल्ह्यातील आंबी या गावात ते एकटे राहत होते, आणि त्याच राहत्या घरात ते मृतावस्थेत सापडले. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारच्या मंडळींनी पोलिसांत तक्रार केली. तेव्हा पोलिसांनी येऊन तपासणी करताच त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. यावेळी पोलिसांनी त्यांचा दोन दिवसापूर्वीच मृत्यू झाला असल्याचं घोषित केलं. यावरून नेटकऱ्यानी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी याला चांगलंच ट्रोल केलं. (Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani)

नेटकऱ्यानी वडिलांसोबत तू का नव्हतास, वडील तुझ्यासोबत का राहत नव्हते असे असंख्य प्रश्नांचा भडीमार करून गश्मीरला ट्रोल केलं. नेटकऱ्यांच्या या प्रश्नांना पूर्णविराम देत गश्मीरने भाष्य केलं आहे. नुकतीच गश्मीरने इटाईम्सला मुलाखत दिली. यावेळी त्याने म्हटलं की, “आमचं नातं एकतर्फी होतं. जेव्हा त्यांना आम्हाला भेटायची इच्छा असायची, तेव्हा ते यायचे. जेव्हा त्यांना एकटं राहावं वाटायचं, तेव्हा ते निघून जायचे.”

आणखी वाचा – Video : …अन् सीमा देव यांच्या पार्थिवा शेजारी बसून रडू लागला अजिंक्य देव, अभिनेत्याची अवस्था पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले

“माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते बराच काळ आमच्यासोबत राहिले होते. ते मूडी होते आणि त्यांना एकटं राहायला आवडायचं. त्यांना त्यांची कामं इतरांनी केलेली आवडत नसे. त्यांच्याजवळ आम्ही केअरटेकर पाठवायचो, पण एक-दोन दिवसांत त्यांना कामावरून काढून टाकायचे. गेल्या तीन वर्षापासून त्यांनी आम्ही, आमचे जवळचे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मित्रांसह लोकांशी मर्यादित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली होती.”

आणखी वाचा – “सीमासारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं…”, सीमा देव यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, “रमेश देव नशीबवान पण…”

पुढे तो म्हणाला, “ते शेजार्‍यांशी संवाद साधणारे किंवा ते जिथे राहायचे तिथे मॉर्निंग वॉक ग्रुपचा भाग बनणारे नव्हते. त्यांच्या मृत्यूबद्दल आम्हाला उशिरा कळण्यामागे हे देखील एक मुख्य कारण होते. सर्वांना मी स्पष्टीकरण देतोय, असं वाटू शकतं. मी जे काही बोलतो त्याचे वेगवेगळे अर्थही काढले जातील, पण हरकत नाही.” असं म्हणत त्याने एकप्रकारे नेटकर्यांना स्पष्टीकरण देत उत्तर दिलं आहे.

Tags: entertainmentgashmeer mahajaniravindra mahajani
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Next Post
marathi films in 69th National Film Awards 2023

69th National Film Awards 2023 : 'एकदा काय झालं', 'गोदावरी' चित्रपटाने पटकावला राष्ट्रीय पुरस्कार, सुबोध भावे म्हणतो, "राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.