बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अंकुश’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, गौरव मोरेचीही दिसली झलक, पाहा व्हिडीओ

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 25, 2023 | 10:28 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Ankush Movie Teaser & Music Launch

'अंकुश' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, गौरव मोरेचीही दिसली झलक, पाहा व्हिडीओ

अॅक्शन, रोमान्स, व मनोरंजनाचा पुरेपूर मसाला आणि मल्टीस्टारर कलाकारांची फौज असलेल्या बहुचर्चित ‘अंकुश’ चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते जॉनी लिव्हर, अली असगर, कृष्णा अभिषेक, गायक आनंद शिंदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे टीझर व म्युझिक लाँच झाले. या सोहळ्याला चित्रपटाचे निर्माते राजाभाऊ आप्पाराव घुले, दिग्दर्शक निशांत धापसे, नवोदित अभिनेता दीपराज घुले, अभिनेत्री केतकी माटेगावकर व अन्य कलाकारांनी हजेरी लावली होती. (Ankush Movie Teaser and Music Launch)

ओमकार फिल्म्स क्रिएशन्स प्रस्तुती व राजाभाऊ आप्पाराव घुले यांची निर्मिती असलेल्या या अॅक्शनपॅक चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया व अन्य माध्यमांमध्ये सुरु आहे. जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हापासून या चित्रपटाबद्दल चित्रपटसृष्टी व प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच या चित्रपटाचं धमाकेदार टीझर लाँच झालं. ज्यामध्ये दीपराज व अन्य कलाकारांचं दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आलारे आला, आला गोविंदा’ गाणं देखील प्रदर्शित झालं. आदर्श शिंदेच्या आवाजात गायलेल्या या गाण्यामध्ये दीपराजचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा – दोन दिवसांनी रवींद्र महाजनींच्या मृ्त्यूची बातमी समोर का आली?, गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा, म्हणाला, “कुटुंबियांशी त्यांनी संपर्क न ठेवता…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

राजाभाऊ आप्पाराव घुले निर्मित व निशांत धापसे दिग्दर्शित ‘अंकुश’ चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांनी लिहिली आहे. या अॅक्शनपॅक चित्रपटातून दीपराज घुले हा नव्या दमाचा अभिनेता पदार्पण करत आहे. त्याच्यासह अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेते सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी तगडी स्टारकास्ट आहेत.

हे देखील वाचा – 69th National Film Awards 2023 : ‘एकदा काय झालं’, ‘गोदावरी’ चित्रपटाने पटकावला राष्ट्रीय पुरस्कार, सुबोध भावे म्हणतो, “राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये…”

View this post on Instagram

A post shared by AnkushTheFilm (@ankushthefilm)

मराठीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमितराज व चिनार-महेश यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर हिंदीतील प्रसिद्ध संगीतकार अमर मोहिले यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिलं आहे. मंगेश कांगणे, क्षितिज पटवर्धन, समृद्धी पांडे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. तर आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज, हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या आवाजात चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

‘अंकुश’ चित्रपटाची निर्मिती ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या बॅनरअंतर्गत होत असून या माध्यमातून राजाभाऊ घुले यांनी चित्रपट निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि अॅक्शन दिग्दर्शक विक्रम मोर, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. अॅक्शन, रोमान्स आणि उत्तम कलावंतांच्या सशक्त अभिनयाची मेजवानी या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. ६ ऑक्टोबरपासून ‘अंकुश’ चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार असून हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहे. (Ankush Movie)

Tags: ankush filmAnkush Movie Teaser & Music Launchankush new marathi movie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Kangana Ranaut On 69th National Award

राष्ट्रीय पुरस्कारांच्या शर्यतीत कंगना रणौतचा पराभव, आलिया भट्ट व क्रिती सेनॉनला पुरस्कार जाहिर झाल्यानंतर म्हणाली, "निराश झालेल्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.