भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित अश्या ६९ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा आज करण्यात येणार आहे. गत एक वर्षात अनेक चित्रपट व कलाकारांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्यामुळे कोणते कलाकार आणि चित्रपट हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पटकावणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (69th National Film Awards 2023)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक पुरस्कार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता नवी दिल्लीत या पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यंदाचा पुरस्कार पटकावण्यासाठी अनेक चित्रपट व कलाकार शर्यतीत आहे. मात्र, यंदा बॉलीवूडच्या चित्रपटांपेक्षा साऊथच्या चित्रपटांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी साऊथचे अनेक चित्रपट शर्यतीत आहेत. यामध्ये ‘RRR’, ‘KGF – २’, ‘पुष्पा: द राइज – पार्ट 1’ सह ‘नायट्टू’ आणि ‘मिन्नाल मुरली’ या दोन चित्रपटांचाही समावेश आहे. तर ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार एम.एम. किरवानी यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बाजी मारणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे देखील वाचा – “रमेश काकांवर अपार प्रेम केलं आणि…”, सीमा देव यांच्या निधनानंतर अश्विनी भावेंची पोस्ट, म्हणाल्या, “स्त्रीच्या आयुष्यातील…”
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते आपली दावेदारी सादर करत आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या शर्यतीत आलिया भट्ट व कंगना रानौत या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींची नावं पुढं येत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी आलियाचं नाव चर्चेत आहे. तर ‘थलाइवी’ चित्रपटासाठी कंगना हा पुरस्कार जिंकणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा – Video : “काल आपण सगळे…”, चांद्रयान-३ चे चंद्रावर लँडिंग होताच पूजा सावंतने केला एकच जल्लोष, व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. यंदाही अनेक मराठी चित्रपट शर्यतीत असून यंदा कोणत्या मराठी चित्रपटाला हा मान मिळणार आहे, याकडं अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा होणार आहे. तर पीआईबी इंडियाच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवर पुरस्काराचे अपडेट्स मिळणार आहे. (69th National Film Awards 2023 announcement)