बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रमेश काकांवर अपार प्रेम केलं आणि…”, सीमा देव यांच्या निधनानंतर अश्विनी भावेंची पोस्ट, म्हणाल्या, “स्त्रीच्या आयुष्यातील…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 24, 2023 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashvini Bhave On Seema Deo Death

"रमेश काकांवर अपार प्रेम केलं आणि…", सीमा देव यांच्या निधनानंतर अश्विनी भावेंची पोस्ट, म्हणाल्या, "स्त्रीच्या आयुष्यातील…"

हिंदी मराठी सिनेसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने व सोज्वळ लूकने मराठमोळी अभिनेत्री सीमा देव यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच घर केलं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिनेमाविश्वातील अनेक कलाकार मंडळी हळहळ व्यक्त करत आहेत. (Ashvini Bhave On Seema Deo Death)

अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत सीमा देव यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. तर बऱ्याच कलाकारांनी सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच सीमा देव यांच्या निधनांनंतर अभिनेत्री अश्विनी भावे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सीमा देव यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबरच त्यांनी त्यांच्या अभिनयाबद्दलही भाष्य केले आहे. आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – “माझी आई व त्यांनी…”, सीमा देव यांच्या निधनानंतर अभिनेते महेश कोठारे भावुक, म्हणाले, “जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा…”

अश्विनी भावे यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “सीमा ताईंच्या निधनाची बातमी ऐकुन खूप दुःख होत आहे. सीमाताईंचे पडद्यावरचे लोभस रूप आणि त्यांच्या तरल अभिनयाने मी लहान वयातच खूप प्रेरित झाले होते. व्यवसाय आणि कौटुंबिक जबादारी यांचा योग्य समन्वय साधून त्यांनी स्त्री कलाकारांना एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि अजरामर भूमिकांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. स्त्रीच्या आयुष्यातल्या सर्वच भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या. रमेश काकांवर आणि मुला-नातवंडांवर अपार प्रेम केलं”.

View this post on Instagram

A post shared by Ashvini Bhave (@ashvinibhave)

“सीमा ताई खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आयुष्य जगल्या. अजिंक्य, अभिनय आणि कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची ताकद लाभो आणि मृतात्म्यास शांती लाभो अशी मी ईश्वरा कडे प्रार्थना करते. ओम शांती” !

आणखी वाचा – “तीन ते चार वर्ष आजाराशी झुंज आणि…”, आईच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक, म्हणाला, “वर्षभरापूर्वी बाबा गेले अन्…”

‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून सीमा देव यांनी उत्तम काम केले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.

Tags: ajinkya deoashvini bhaveentertainmentramesh deoseema deo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
69th National Film Awards 2023

६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची उत्सुकता शिगेला, आलिया भट्ट व कंगना रणौतमध्ये स्पर्धा, कोणत्या मराठी चित्रपटांचा सन्मान होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.