बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सीमासारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं…”, सीमा देव यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, “रमेश देव नशीबवान पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 24, 2023 | 5:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hemangi Kavi On Seema Deo

“सीमासारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं…”, सीमा देव यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, “रमेश देव नशीबवान पण…”

अभिनेत्री सीमा देव यांनी त्यांच्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने सिनेसृष्टीत चांगलीच छाप पाडली. ऐंशी, नव्वदीच्या काळ गाजवणारे या अभिनेत्रीच आज २४ ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. पती रमेश देव यांच्या निधनानंतर त्या खचल्याने आजारी होत्या. अशातच आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. आणि संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. अनेक कलाकार मंडळींनी पोस्ट शेअर करत सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली. अशातच सीमा यांच्या लोकप्रियतेचा एक किस्सा सांगत हेमांगी कवी हिने देखील सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केली आहे. (Hemangi Kavi On Seema Deo)

सीमा देव यांच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत हेमांगीने लिहिलं, ‘लहानपणी दूरदर्शनवर ‘सुवासिनी’ लागला होता. अभ्यास संपवून मी जेव्हा बाहेरच्या खोलीत आले (तेव्हा १ रूम किचन मोठी गोष्ट होती) त्यातलं ‘ह्रदयी प्रीत जागते’ गाणं सुरू होतं! एक अतिशय सालस, सोज्वळ, सुसंस्कृत, सादगी से भरा, गोड चेहरा मी पाहीला. मी लगेच बाबांना विचारलं ‘ही कोण पप्पा?'”

आणखी वाचा – “रमेश काकांवर अपार प्रेम केलं आणि…”, सीमा देव यांच्या निधनानंतर अश्विनी भावेंची पोस्ट, म्हणाल्या, “स्त्रीच्या आयुष्यातील…”

“(आपण सर्रास पडद्यावर दिसणाऱ्या लोकांना अरे, तु रे करूनच संबोधतो, वयात कितीही अंतर असलं तरी) तर पप्पा म्हणाले ‘सीमा.’ मी म्हणाले ‘पप्पा किती सुंदर दिसते ओ ही!’ मला चित्रांची आवड असल्यामुळे पुढे म्हटलं ‘बाईचा परफेक्ट चेहरा!’ त्यावर पप्पा म्हणाले’“हो न अगदी बायको मटेरियल!’ भाजी निवडता निवडता मम्मीने पप्पांकडे पाहीलं त्यावर ते म्हणाले ‘एकदम तुझ्या मम्मीसारखा!’ पप्पा वाचले”.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

“गंमतीचा भाग सोडा तेव्हा खरंच ‘जगाच्या पाठीवर’, ‘या सुखांनो या’, ‘मोलकरीण’, ‘आनंद’ मधल्या सीमासारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं प्रत्येक पुरूषाला वाटत असणार! रमेश देव नशीबवान! पण ते ही तेवढेच देखणे! म्हणजे प्रत्येक बाईच्या हसबँड मटेरियलमध्ये चपखल बसणारा चेहरा! दोघांची जोडी तर म्हणजे रब ने बना दी जोडीच जणू! मागच्या वर्षी रमेश देव गेले…आज सीमा देव!”

आणखी वाचा – ‘या’ गंभीर आजाराचा सामना करत होत्या सीमा देव, काही आठवतंही नव्हतं अन्…; अजिंक्य देवने सांगितली सत्य परिस्थिती

“खरे जोडीदार एकमेकांशिवाय फार कळ वेगळे राहू शकत नाहीत हेच खरं! सीमा देव यांनी एका चित्रपटात खलनायिकेची भूमिका केली होती. कमाल अभिनय. त्यांच्या सोज्वळ, गोड भूमिकेपेक्षा अतिशय वेगळा! म्हणजे अशा चेहऱ्याची बाई असं ही वागू शकते बरं का याचं ते उत्तम उदाहरण!’ हेमांगीची ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये व्हायरल होतेय”.

Tags: entertainmenthemangi kaviseema deo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Seema Deo Death

Video : …अन् सीमा देव यांच्या पार्थिवा शेजारी बसून रडू लागला अजिंक्य देव, अभिनेत्याची अवस्था पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.