शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

’12th Fail’ फिल्मफेअरमध्ये पास, करुन दाखवलं! एक नाही तर तब्बल एवढ्या पुरस्कारांवर कोरलं नाव, जाणून घ्या…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 29, 2024 | 1:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Filmfare Awards 2024

'12th Fail' फिल्मफेअरमध्ये पास, करुन दाखवलं! एक नाही तर तब्बल एवढ्या पुरस्कारांवर कोरलं नाव, जाणून घ्या…

Filmfare Awards 2024 : ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ (Filmfare Awards २०२४) हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा गुजरात येथील गांधीनगरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ‘फिल्मफेयर अवॉर्ड्स २०२४’ करण जोहर, आयुष्मान खुराना व मनीष पॉल यांनी होस्ट केला. ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट तर सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूरला पुरस्कार मिळाला. तर ‘१2th Fail’ या चित्रपटाने यंदाच्या फिल्मफेअरमध्ये बाजी मारली.

‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’मधील सेलिब्रिटींचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींचं अभिनंदन करत आहेत. ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यातील लक्षवेधी बाब ठरली ती म्हणजे ’12th Fail’ चित्रपट होय. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन पुरस्कार या चित्रपटाच्या नावावर आहेत.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, केक कापला अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

अभिनेता विक्रांत मेस्सीचा ’12th Fail’ या सिनेमानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. काही महिन्यांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं फारसं प्रमोशन न करता थिएटरमध्ये तग धरून ठेवला. IPS अधिकाऱ्याच्या जिद्दीच्या कहाणीने फिल्मफेअरमध्ये बाजी मारलेली पाहायला मिळत आहे. विधु विनोद चोप्रा यांनी छोट्या बजेटमध्ये तयार केलेला सिनेमा सक्सेसफुल ठरला. लेखक अनुराग पाठक यांनी 2019साली लिहिलेल्या एका नॉन फिक्शन पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे. IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे.

आणखी वाचा – Video : “इगो हर्ट झाला मॅडमचा…”, ‘बिग बॉस’च्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अंकिता लोखंडेच्या ‘त्या’ कृतीवर नेटकरी भडकले, म्हणाले…

यंदाच्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ मध्ये 12th Fail चित्रपटाने बाजी मारली. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार पुरस्कार या चित्रपटाच्या नावे आहेत.
सर्वोत्कृष्ट चित्रपट -(12th Fail)
सर्वोत्कृष्ट अभिनेता विक्रांत मेस्सी (क्रिटिक्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विधु विनोद चोपडा
सर्वोत्कृष्ट पटकथा – विधु विनोद चोप्रा

Tags: 12th fail69th Filmfare Awardsbest movieentertainmentfilmfare awards 2024
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
rohit raut wife post

रोहित मानेने बायकोसह केला नव्या घरात प्रवेश, अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केला नव्या घरातील पहिला फोटो, म्हणाली, "स्वप्न एकत्र पाहिलं अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.